विश्वास...
विश्वास...
अलक
विश्वास ...
सेलिब्रेटी
गणपतीबाप्पाच्या दर्शनासाठी तो आठ तास रांगेत उभा राहिला आणि त्याचा नंबर येताच एका कार्यकर्त्याने त्याला समोर ढकलले दुसऱ्या कार्यकर्त्याने पलीकडे ओढून घेतले.
कसेबसे दर्शन घेऊन तो घरी आला तर घरचा गणपतीबाप्पा हसून म्हणाला - "झाले दर्शन? तिथे रांगेत तू आठ तास माझ्या दर्शनाची वाट बघत होता आणि मी तुझ्याच घरात तुझी. नवस बोलायला सेलिब्रेटी कशाला हवाय? माझ्यावर विश्वास नाही."
@ अरुणा गर्जे
