नाळ...
नाळ...
नाळ...
स्वयंपाक करीत असतांना हाताला चटका बसला तशी ती पटकन "आई गं!" म्हणून विव्हळली.
नंतर मनाशीच म्हणाली " मला तर आई कशी असते ठाऊकच नाही. काटेरी झुडपात सापडले आणि अनाथाश्रमात लहानाची मोठे झाले. मग आज आई म्हणून मी कुणाला आणि का हाक मारली? फक्त नाळ जोडल्या गेली होती म्हणून? "
@अरुणा गर्जे
