अलक...
अलक...
वय...
"आवड आणि निवड नव्हतीच कधी आम्हाला.मोठे जे सांगतील ते खाली मान घालून ऐकायचे आणि ते म्हणतील त्याच्या गळ्यात माळ घालून नेटाने संसार करायचा. संगीत शिकायची खूप इच्छा होती गं माझी."
हे ऐकताच नात काही तरी ठरवून मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली -
" शिकायला वय नसतं आजी."
@ अरुणा गर्जे
