किशोर राजवर्धन

Others

5.0  

किशोर राजवर्धन

Others

अलिबाग…. एक सकारात्मक प्रवास…

अलिबाग…. एक सकारात्मक प्रवास…

5 mins
1.0K


दोन- तीन महिने झाले. कुठलचं नविन लेखन किंवा कविता नाही किंवा काहीच सर्जणशील घडतं नव्हतं. ह्या अनावधानाने मीच माझ्याकडे नकळतं काही नकारात्कम आकर्षित करत होतो आणि याची पोच पावती मला मिळत होती. मी पुन्हा याच शोध घेत असताना जुन्या पुस्तकातील काही संदर्भ पुन्हा माझ्या नजरे समोर पडले. तसेच एका चर्चेचा संदर्भ आठवला….आणि मी स्वत:ला खुष , आनंदी करत पुन्हा पुर्ववत लिखाणाकडे परतण्यासाठी प्रयत्न करत होतो…मी पुन्हा मला आवडणारे चित्रपट पाहण्यास सुरुवात केली. त्यातील हॅरी पॉटर चित्रपटांची मालिका माझी आवडती..चित्रपटातील हॅरी सारख्या सामान्य मुलामधील अदभुत साहस , मैत्री मला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन भेटत. लागोपाठ दोन दिवस सुरवातीचे दोन्ही भाग मी पाहिले आणि ह्या कलाकृतीतुन मला माझ्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन सापडलं. मी अगोदर ज्या दृष्टिकोणातुन हे चित्रपट पाहत होतो. त्यात बदल करुन मी सकारात्कम दृष्टिकोणातुन हा चित्रपट पाहु लागलो.. लहान मुलं ही निसर्गाशी ताळमेळ साधत स्वत:चा आनंद अगदी सहज शोधतात. लहान हॅरी पॉटरची रॉन आणि हर्माईनी सोबत होणारी मैत्री, जादुच्या दुनियेत त्याच पहिलं पाऊल आणि स्वत:च्या मनातील भीतीवर मात करत त्याच्या हातुन होणा-या अचंबित घटना , नकारात्मक ते कडून सकारात्मक विचाराकडे नेणारी साहसीवृती ह्या मी पुन्हा नव्याने आवलोकन केलं की, माणसाच्या आयुष्यात त्याने जर त्याच्या आवाक्या बाहेरील एखादी गोष्ट किंवा लक्ष ठरवलं तर त्याच्या मनातील चैतन्य आणि निसर्गातील असिम उर्जा ह्या ती गोष्ठ किंवा लक्ष त्याला मिळवुन देण्यासाठी योग्य तो ताळमेळ साधुन पुर्ण करते.

           हीच गोष्ठ आज मी सकाळी अंथरुणात लोळत असताना पुन्हा माझ्या लक्षात आली आणि मी आठवलं की, मला काहीतरी साहसी काम हाती घेतलं पाहिजे. इतक्यात माझ्या लक्ष्यात आलं की, माझि नविन स्कुटी मी जास्ती जास्त 8 ते 10 किलोमीटर चालवतो. आज मी तीला माझ्या घरापासुन( पनवेल) ते अलिबाग समुद्र किना-या पर्यंत घेऊन जाउ, हेच माझं आजचं लक्ष मी ठरवलं. मनात थोडी भीती होती कारण आयुष्यात पहिल्यादां एवढ्या लांबचा प्रवास (Traget) मी ठरवलं होतं. ही गोष्ट मी माझ्या मिसेसला सांगितली. क्षणभर वाटलं हीला आधिच माझ्या ड्रायव्हिंग बद्द्ल शंका आहे. काय ? बोलेल कुणास ठाऊक , तिने क्षणाचाही विलंब न लावता ‘हो’ म्हंटलं. आता माझ्या ‘स्व’ परिक्षा ‘स्वत:शीच’ होती.

           मी तयारी करुन गाडीत पेट्रोल भरुन आणत असताना मन आता भीतीच्या नकारात्मक विचारात मला अडकवु पाहत होतं ….हे कसं होईल..?, मला हे.. जमणार नाही..! , मला तिचं आणि मुलाच वजन झेकेल का..? वजन बँलेंस होईल का..? वगरे प्रश्नांनचा विचार करत मी घरी आलो आणि सोफ्यावर पडून डोळे बंद करतं मी ‘परित्राण पाठ’ यातील शब्द स्वत:शीच म्हटले..थोडावेळ मला झोप लागली. उठलो तर माझ्या मॅडम आणि मुलगा पिकनिकची तयारी करुन प्रवासाला निघण्यासाठी तयारीत होते. मला आठवलं की, मी फक्त वीस मिनिटे झोपलो असेल पण त्या वीस मिनिटाची झोप मला प्रवासाला निघण्यासाठी ताजेतवाना वाटत होती. जणु काही मनाने लक्ष साध्य करण्यासाठी निसर्गाशी योग्य ताळमेळ घातला होता.

           मी पार्किंग मधुन गाडी काढली. बिल्डींगच्या गेट बाहेर आलो. मिसेसने घर व्यवस्थित लॉक करुन खाली आली आणि आम्ही आता माझं लक्ष साध्य करण्यासाठी प्रवास सुरु करण्यासाठी गाडी स्टार्ट केली. सुरवातीला स्कुटी तिघांच्या वजनाने थोडी हाल्ली. मी मिसेस्ला म्हंटल..”तुझा हात माझ्या खांद्यावर ठेव ” ती म्हणाली “का?” (खरतरं मला तिने खांद्यावर हात ठेवला की, भीती नाहीशी होते. पण ह्या क्षणी जर मी हीला सांगितलं तर मला परत काहीतरी म्हणेलं आणि भावनिकतेत नंतर काहीतरी चुका होता.) म्हणून मी म्हंटल काही नाही “तुझं वजन बँलेंस होईल ..” आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली…रस्त्यातील खड्डे, अडथळे मागे सोडत आम्ही नॅशल हायवेवर आलो.. आता ईथे गाडी पळत होती आणि मी जणु चाणक्षुन गती, खड्डे आणि रस्त्यावर नजर ठेवुन गाडीच्या गतीचा , निसर्गाचा अनुभव मनात साठवत होतो…अलिबागला जायला गुगल मॅप1तास 40 मिनिटे दाखवत होतं….पंधरा मिनिटा नंतर माझ्या हाताला मुंग्या येऊ लागल्या आणि हात सुन्न  होत होता. कारण गाडी मी जास्ती जास्त 10 ते 15 मिनिटच्या वर चालवली नव्हती. मी गाडी बाजुला घेतली. जिथे थांबलो पाहिलं तर कर्नाळा आला होता. अश्रर्यकारकरित्या मी सुखरुप 20 किलोमिटर पुढे आलो होतो. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात केली… गाडीला मोकाट पळण्यासाठी रोड मोकळा होता आणि मी ही हळूहळू का होईना गती वाढवुन तीच्यातले ऑटोगिअर बदलताना अनुभवत होतो. पुन्हा तसंच हाताला जाणवु लागलं. मी समोर बोर्ड पाहिला. ‘पेन’ आणि घड्याळावर वेळ पाहिली कर्नाळा सोडून आर्धातास झाला होता. मी अनुभवल की, ड्रायव्ह करताना माझा वेळ वाढत होता.. पुन्हा थोड थांबलो..आणि परत प्रवासाला सुरुवात केली.. काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू होती आणि काही ठिकाणी सपाट रस्त्या ऐवजी पुन्हा रस्त्यात खड्डे होते. अचानक विचार आला की, कोणत्याही गोष्टीकडे माणुसं संधी म्हणुन बघंत नाही. हे खड्डे म्हणजे आयुष्यात सुख आणि दु:ख यांच्यातील अंतर आहे. दु:खात जर आपण सकारात्मक विचार केला तर लवकर अडथळे दुर होतात आणि नकारात्मक विचार केला तर त्यात अडकुन राहतो किंवा आणखी खड्डे तयार करतो आणि त्याच गोष्ठची वाढ होते. जिथे आपल लक्ष असतं.

मी पुन्हा हायवेवर गाडी आणली आणि आलिबागच्या दिशेने वेग घेतला. पुन्हा हाताला तसचं जाणवलं. घड्याळ पाहिलं पेन सोडून पाऊन तास झाला होता. पोयनाड आलं. गुगुल मॅपनुसार मी पोहचलो पाहिजे होतं. पण खुष होतो की ड्रायव्ही करताना माझा वेळ वाढत होता. वातावरण तसं ढगाळेलं होत. दुपारचे चार वाजले होते. पोयनाडला आम्ही थांबलो. फ्रेश झालो. नाश्ता केला. पुन्हा प्रवासाला सुरुवात केली ह्यावेळी वळण आणि घाटांचे रस्ते जास्त होते. जे माझ्यासाठी नखवे होते. डोंगराळ वाटा आजुबाजुला घनदाट झाडी , थंड , ताजी गुलाबी हवा आणि क्षणाक्षणाला वळण घेणारे रस्ते हा रोमांचकारी निसर्गाचा अनुभव घेत ‘मन’ जणु गाडीच्या वेगा सोबत खुलत होतं. रस्त्यात येणारी गावे मागे सोडत मी वेग घेत होतो.. मी 5.45 ला अलिबाग शहरात प्रवेश केला. पण माझं लक्ष होतं अलिबागचा अथांग समुद्र किनारा..आणि मी त्याच्याकडे जाण्याकरिता पुन्हा वेग घेतला. अंधार पडला होता. आम्ही समुद्र किनारा गाठला. समुद्राला अहोटी आली होती. आणि मन आनंद होऊन लक्ष पुर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करत होतं…

           आज मी माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंब ,स्कुटी सोबत 63 किलोमीटर ड्रायव्हींगच लक्ष साध्य केलं होतं आणि ते पण सुरक्षित. मला प्रतिलिपीवर मी केलेल्या एका चर्चचेचे शब्द आठवले की, मन आणि बुध्दीला सकारात्मक विचारांची सवय जर लावली तर माणुस खरोखर आनंदी आणि सुखी होऊ शकतो. एक सकारात्मक विचार आपल्यातील अदभुत साहस, आनंद, सुख प्राप्त करुन देण्यासाठी निसर्गासोबत योग्य तो ताळमेळ घडवुन आपल्या त्याचा अनुभव करुन देतो.


Rate this content
Log in