सदाचारी सुगत
सदाचारी सुगत
महानगरातील झोपडपट्टीत राहणारा सुगत शहरात लोकांच्या वस्ती , बिल्डिंग , घरोघरी हिंडुन त्यांच्या घरातील जुनी भांडी घेऊन त्या बदल्यात कपडे देऊन विकत असे आणि ति जुनी भांडी विकुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो शील, सदाचारी मनाने स्वच्छ मनुष्य होता.
एकदा एका चौकात पानपट्टीवर दुपारच्या विरंगुळा करत असताना, पानपट्टीवाल्या सोबत गप्पा मारत उभा होता. तेव्हा त्याची ओळख त्याच्या सारख्याच उद्योग करणा-या श्रेयसशी झाली. त्या दिवशी भर उन्हात श्रेयस “आज कोणत्याच धंदा झाला नाही ” म्ह्णुन चिडचिड करत व्याकुळ झालेला होता. त्याला शांत करत सुगतने आपल्याकडची छोटी पाण्याची बॉटल त्याच्या हातात देत म्हणाला “ अरे..! भाई धंद्यात नरम गरम चलत रहतं ” “ स्वत:वर विश्वास ठेव ” त्या उन्हात घोटभर पाणी पोटात ढकल्यानंतर श्रेयसला बरं वाटलं. पण तरीही त्याने रागातच सुगतला प्रतित्तर दिलं “ तुला बोलायल काय जात? ” सुगतने ते शांतपणे ऐकुन सोडून दिलं तेव्हा पासुन दोघांची तोंड ओळख झाली.
आज सुगत त्याच (भागात) एरियाच्या चौकात आला. तिथे त्याला श्रेयस दिसला. तेव्हा दोघांचाही तोच उद्योग असल्यामुळे आणि श्रेयसचा तापट स्वभाव बघुन दोघांमध्ये भांडण होऊ नये, ह्या कारणामुळे सुगतने श्रेयसला “ पहिलं तु फेरी मारुन ये!” म्हणुन जाऊ दिलं.
त्या (भागात) एरियात एका बिल्डींगमध्ये एके काळी ऐश्वर्य संपन्न असलेले असे एक श्रीमंत घर होते. पण महामारीच्या रोगामुळे घरातील सर्व एकामागून एक गेले. सारा परिवार गेला आणि त्या घरातील सारे ऐश्वर्य जाऊन त्याला अवकाळा आला. घरात फक्त दोन मुली उरल्या होत्या. एक वयाने मोठी लोकांची घरकामे करुन कसेबसे लहान बहिणीला सांभाळत होती. घरात अडगळीच्या जागेत घर ऐश्वर्य संपन्न असतानाची सोन्याची वाटी होती. पण बरीच वर्ष वापरात नसल्यामुळे तिच्यावर मळाची अशी काही पुटे चढली की, ती सोन्याची आहे. असे कुणीही म्हटले नसते. तिच्या लहान बहिणीने एक दिवस अडगळीची जागा स्वच्छ करण्याच्या हेतुने साफसफाई केली. त्यात तिला मळकट वाटी जुन्या पुरान्या भांड्यांमध्ये भेटली. त्या दोघींना, ती जुनी फुटकी वाटी सोन्याची आहे हे माहित नव्हतं.
बिल्डींगच्या खालुन श्रेयस “ भंगार वाला..! तुटे फुटे बर्तन देदो..! कपडे लेलो... अच्छे.. अच्छे..ड्रेस पिस लेलो..! म्हणुन ओरडत रस्त्यावर चालला होता. लहान बहिणीने त्याचा आवाज ऐकुन त्याच्याकडुन एखादा चांगला ड्रेस पिस घ्यावा, असे तिला वाटले. ती मोठ्या बहिणीला म्हणाली. “ ताई, मला एखादा चांगला ड्रेस पिस घे ना !”
“अगं, मी अशी घरकाम करुन पै- पै जोडून दिवस ढकलते, काय देऊन डेस पिस घ्यायचा?” तिने अडगळीची जागा स्वच्छ करताना जुनी भांडी एका पिशवीत बांधली होती. ति मोठ्या बहिणीला दाखवतं म्हणाली “ ही बघ अडगळीच्या जागा स्वच्छ करताणा काही तुटलेली फुटलेली जुनी भांडी सापडली आहे. ती देऊन घे.” “ बरं तर, मार हाक त्याला ”
त्या लहान बहिणीने हाक मारताच श्रेयस तिच्या घरी गेला. तिने तुटलेल्या फुटलेल्या जुन्या भांड्यांची पिशवी त्याच्या समोर ठेवली. त्याने पिशवीतील भांडी कोणत्या परिस्थितीत आहेत आणि त्याप्रमाणे काय देता येईल ह्याचा निषर्कश काढण्यासाठी पिशवी उघडली आणि तुटलेल्या फुटलेल्या जुन्या भांड्यांवर आपली नजर फिरवली. त्यात त्याला मळाची काळी तुटलेली वाटी दिसली. त्याने सहनिशा करण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या छोट्याशा खड्याने, तिच्यावर एक ओरखडा ओढला. त्या बरोबर ही वाटी सोन्याची आहे. अशी खुण त्याला पटली. त्या भोळ्या मुलींना काही न देता ती भांडी लुबाडायची असा बेत मनात त्याने केला. वेडे वाकडे तोंड करत तो म्हणाला “ याची काय किंमत घ्यायची? ड्रेस पिस मधला अर्धा कापडसुध्दा कुणी देणार नाही. सगळी तुटलेली भांडी..” म्हणून त्याने ति भांड्यांची पिशवी जमिनीवर टाकुन देऊन तो उठला
व तडक चालू लागला.
थोड्या वेळाने तो जातो न जातो तोच सुगत त्याच बिल्डींगच्या खाली तसाच पुकार करत त्या रस्त्याने येत होता. परत त्या लहान बहिणी मोठ्या बहिणीला म्हणाली “ ताई, आता तरी मला काहीतरी घेऊन दे.”
“ अगं ! पहिल्या भांडीवाल्याने पाहिलंना पिशवी जमिनीवर फेकुन निघुन गेला. आता काय देऊन ड्रेस घेऊ?”
“ पण ताई, हा भांडीवाला दिसायला स्वभावाने कसा चांगला आहे. त्याचा आवाजसुध्दा गोड आहे. पहिला होता तो कसा रागिट वाटत होता व त्याचा आवाज देखिल राग़िट होता. “ ताई ! शेवटचा प्रयत्न, बोलावू त्याला?”
“ बरं बाई. बोलावं त्याला ”
लहान बहिणीने हाक मारली तसं सुगतने त्या आवाजाकडे पाहिलं आणि तिच्या घरी आला. लहान बहिणीने तुटलेल्या फुटलेल्या जुन्या भांड्यांची पिशवी त्याच्या समोर ठेवली. त्याने सुध्दा पिशवीतील भांडी कोणत्या परिस्थितीत आहेत आणि त्याप्रमाणे काय देता येईल ह्याचा निषर्कश काढण्यासाठी पिशवी उघडली आणि तुटलेल्या फुटलेल्या जुन्या भांड्यांवर आपली नजर फिरवली. त्यात त्याला मळाची काळी तुटलेली वाटी दिसली. त्याने सहनिशा वाटी हाता घेतली आणि निरखुन पाहिली त्याच्यावर श्रेयसने केलेला ओरखडा पाहिला. वाटी सोन्याची आहे हे लगेच त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, “ ताई, हे भांड सोन्याच आहे. त्याच्या किंमतीचा कापड माझ्याकडे नाही. माझ्या जवळचे हे ५०-६० ड्रेस पिस देऊन पण होणार नाही.”
“ अगं बाई, हे तर नवलचं आहे..! तो पहिला भांडीवाला तर म्हणाला ड्रेस पिस मधला अर्धा कापडसुध्दा कुणी देणार नाही. म्हणून अगदी जमिनीवर टाकुन तो निघुन गेला की ! “ ति व्याकुळ होऊन म्हणाली “ तुझ्या हाताच्या स्पर्शानेच हा चमत्कार घडला वाटतं नाहितर एवढी वर्ष मी घरकाम करुन पै-पै जोडून दिवस ढकलते ! ह्या दरिद्र घरात एक फुटकी कवडीसुध्दा मिळाली नाही मला, महामारीच्या अजारात घरातले सर्व एकामागून एक गेले, आम्हाला काहीतरी दे आणि ही तुटलेल्या फुटलेल्या जुन्या भांड्यांची पिशवी घेऊन जा..! उगाच घाण नको ती घरातं..!” हे म्हणतं तिचा उर भरुन आला आणि ति ढसाढसा रडु लागली.
त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या जवळ असलेली तेवढ्याच किंमतीची रोख आणि सारा माला दोन्ही बहिणींना देऊन भांड्याची पिशवी उचलुन घेतली आणि घावत लगबगीने बस स्टॉपवर आला.
आणि इकडे काय झाले?
थोड्या वेळाने रागीट, लोभी श्रेयस फिरुन पुन्हा त्या बिल्डींगच्या खाली आला आणि त्या मोठ्या बहिणीला म्हणाला, “ द्या ति तुटलेली फुटलेली जुनी भांडी एखादा ड्रेस पिस देतो तुम्हाला त्या बद्द्ल्यात.” तिने उसनं आव आणून म्हणाली “ वा रे वा ! तु तर त्या तुटलेली फुटलेली जुनी भांड्यांची किमंत ड्रेस पिस मधला अर्धा कापडसुध्दा कुणी देणार नाही, अस मगाशी म्हणालास. पण आताच एक चांगला सज्जन भांडीवाला आला, त्यानं आम्हाला त्या बद्दल्यात काही पैसे आणि ड्रेस पिस दिले आणि आम्ही त्याला ति तुटलेली फुटलेली जुनी भांडी देऊन टाकली.” हे ऐकल्याबरोबर ‘आज तो आयत्या संधीला मुकला. अनर्थ घडलं.’ असा विचार मनात येऊन श्रेयसच्या रागाचा पारा चढला. त्याने भान हरपले. संतापाने तो कापू लागला. त्याने आपला माल रस्त्यात टाकून दिला. रागातच हातात रस्त्यावरचा दगड उचला आणि धावत बस स्टॉपवर आला. त्याने सुगतला बसमध्ये चढलेला पाहिलं. रागातच हातातला दगड बसच्या दिशेने फेकून दिला आणि त्या बसच्या मागे धावू लागला. धावता – धावता त्याच्या पायाला ठेच लागून तो जमिनीवर खाली पडला. जमिनीवर पडताच त्याच्या छातीतुन रक्त बाहेर पडले. त्याने रक्तकसे येते हे पाहत असताच त्याचा लक्षात आले की, जो दगड त्याने बसच्या दिशेने फेकला होता. तोच त्याच्या छातीत रुतुन बसला आहे. अखेर त्याच्या ह्द्य ठोके थांबले व तो तिथेच मरुन पडला.
घडलेला अपघात बघण्यासाठी लोकांनी पाळापळ सुरु केली.....
(मुल्य : सदाचारी व्यक्ती जीवनातील कठीण पेच प्रसंगातुन सुख रुप बाहेर पडतात. रागीट , लोभी व्यक्ती सर्व काही गमावून बसतात. )