अलक
अलक

1 min

241
राखी पोर्णिमेच्या दिवशी ती आईबरोबर तिच्या भावासाठी राखी आणायला गेली होती. राखी वाल्याकडच्या भरपूर राख्या बघून ती त्याला म्हणाली, " दादा, तुझ्याकडे कित्ती राख्या आहेत ; पण तुझ्या हातावर एकही राखी बांधलेली नाही !"
त्याचा तो दुःखी चेहरा बघून तिने विकत घेतलेली राखी त्याच्या मनगटावर बांधली.
त्या दिवशी त्याला ख-या अर्थाने राखीचे मोल मिळाले होते.