अलक
अलक


नवरा गेल्यानंतर सैपाकाची कामे करुन ती घर चालवत होती. श्रावणात पुरणपोळ्यांच्या मागणी खूप असायची म्हणून काकू तिला पुरणपोळ्या करायला बोलावयाच्या आणि तिला योग्य तो मोबदला द्यायच्या. कधी एखादी पुरणपोळी फाटली किंवा जास्त भाजली गेली तर ग्राहकांना देऊन चालायची नाही म्हणून त्यातल्या पुरणपोळ्या काकू तिच्या मुलीसाठी द्यायच्या. मुलीला हे कळल्यावर मुलगी आईला म्हणाली," आई, रोजच तू पोळी भाजताना जास्त भाज किंवा तुकडा तोड ना ."