अलक
अलक

1 min

423
एकादशीच्या दिवशी उपासाचे पदार्थ खायला त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने अर्धा डझन केळी घेतली. तितक्यात त्याच्या वाचनात आले की आज केळी दान केली आणि विष्णूला अर्पण केली तर पुण्य लाभेल आणि लक्ष्मीप्राप्ती होईल.
त्याने स्टेशनवरच्या चार बायकांना केळी दिली आणि तो विष्णूच्या देवळात गेला. दोन केळी विष्णूच्या देवळात अर्पण करताना देवाला म्हणाला,' देवा , आज निर्जला एकादशीचे पुण्य पदरात पडले. '