अलक
अलक


पावसाने थैमान घातल्याने रेड अलर्ट जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे तो मजुरीला जाऊ शकला नाही. घरातल्या उरल्यासुरल्या जिन्नसांमधुन तिने अर्धामुर्धा सैपाक करुन नव-याला आणि मुलाला जेवण वाढले आणि सांगितले तुम्ही जेऊन घ्या. सोमवार आणि अधिक श्रावणातील सोमवारचा उपास केल्याने जास्त पुण्य मिळतं म्हणून मी उपास धरलेत.