अलक
अलक

1 min

210
गावातील दहा जणांच्या एकत्र कुटुंबात काम करणारी ती एकटीच असल्याने तिला खूप काम कराव लागयच.शेतातल्या कामाबरोबर कपडे, भांडी ,स्वयंपाक या सगळ्या कामाने ती बिचारी थकुन जायची.
बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी तिला सासुने सांगितले की उद्या बैलांना छान सजवुन त्यांना गोडधोड खायला घाल.उदयाचा दिवस त्यांचा विश्रांतीचा म्हणून एक लाड करायचे.
तिच्या मनात आल एक दिवस 'सुन पोळा' सुध्दा हवा होता.