अलक
अलक


श्रावण महिन्यातच तिच्या चेहर्यावर टुकटुकी कशी असते असा प्रश्न तिच्या वर्गशिक्षकांना पडायचा.
श्रावण महिना तुम्हाला का आवडतो असा प्रश्न बाईंनी विचारल्यावर ती प्रामाणिकपणे उत्तरली, " श्रावण महिन्यात सण भरपूर असतात . माझी आई काम करते त्या काकुंकडे नैवेद्यासाठी गोडधोड पदार्थ केले जातात. वर्षभर मिळत नाहीत एवढे गोड पदार्थ एका श्रावण महिन्यात मला जेवायला मिळतात."