अलक
अलक


मुंबईत शिकायला होता तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो कोणाला घरी बोलवत नसे. मुलांनी गावाला त्याच्या घरी पिकनिकला जायच ठरवल.
त्याच्या एकत्र कुटुंबातील सदस्यांनी छान पाहुणचार केला. आईने आणि काकीने मायेने छान छान पदार्थ करून घातले.
जाताना मुले खुश होऊन म्हणाली माणसांची एवढी श्रीमंती तुझ्याकडे आहे!