अलक
अलक


श्रावणात सोनसळी चाफ्याच्या घमघमाटाने सारा परिसर धुंद झाला होता. सोनचाफ्याच्या कडेलाच असलेल्या साध्या तगरीकडे घमेंडीने बघून तिला हिणवत सोनचाफा म्हणाला,' तुला ना गंध ना रंग !'
त्यावर तगर म्हणाली,' माझे अस्तित्व संपते तेव्हा माझे सगळे अवयव माझ्या बरोबर असतात; पण तुझे अस्तित्व संपत यायची वेळ जवळ आली की एकेक पाकळी तुला सोडून जाते.'