STORYMIRROR

Achala Dharap

Inspirational

3  

Achala Dharap

Inspirational

अलक

अलक

1 min
221


  व्रतवैकल्यांची आवड असलेल्या आणि आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून तिला वाटत होते आपल्या सुनेनी मंगळागौर पुजावी. पण तिच्या मुलानेच सांगितल की ती आय.टी. फिल्डमधली आहे आणि नास्तिक आहे तर ती तयार होणार नाही.

   श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी सासुबाईंबरोबर लवकर उठून छान साडी नेसून नथ वगैरे दागिने घालून ती तयार होती. तिच्या नव-याला आश्चर्य वाटले तर ती म्हणाली,' सासुबाईंनी आज मंगळागौरीचा इव्हेंट ठेवलाय.'


Rate this content
Log in