एम. जी. रोडचा झपाटलेला बंगला
एम. जी. रोडचा झपाटलेला बंगला


तुम्हाला पुण्यातील एम.जी. रोड हा भाग माहिती असेलच...अतिशय गजबजलेल्या पुण्यातील एम.जी. रोड या भागात अनेक मोठमोठी दुकाने, शोरूम्स, हॉटेल्स आहेत. पण तुम्हाला जर सांगितलं की या वर्दळीच्या भागात एका भूताचे सुद्धा वास्तव्य आहे...! तर तुम्हाला या गोष्टीवर आधी तर विश्वासचं बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. याच भागात आहे एक ओसाड निर्जन बंगला जो किती काळापासून तसाच पडून आहे हे सांगता येत नाही.
असं म्हणतात की, या बंगल्यात एका तरुण स्त्रीला जाळून मारले होते. त्या स्त्रीच्या भुताने संतापून या बंगल्यावर कब्जा केला. रात्रीच्या वेळी या बंगल्यातून भयानक
किंकाळ्या येतात हे अनेकांनी ऐकले आहे म्हणतात.
काही धाडसी लोकांनी या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला पण त्यांना अचानक वातावरणात झालेले बदल अनुभवास आले. बर्फ पडत असल्यासारखी थंडी जाणवली. काहीजणांच्या म्हणण्यानुसार इथले जुने फर्निचर, दारे, खिडक्या एका लयीत संथ आवाज करत वाजत राहतात जणू त्यांना कुणीतरी मुद्दाम वाजवत आहे.
(टीप :- माझा कोणत्याही व्यक्ती किंवा जागेला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे व भीती घालण्याचा पण मानस नाही आहे. या वरील कथेमध्ये कितपत तथ्य आहे हे जाणकारच सांगू शकतील.)