पोहरीचा किल्ला
पोहरीचा किल्ला


पूर्वी ही जागा खूप सुंदर होती पण आज ती भुतांनी ताब्यात घेतली आहे असे म्हटले जाते. येथील आत्मे इतके भयानक आणि वाईट आहेत की दिवस मावळल्यानंतर कोणीही येथे राहिले किंवा थांबले तर ते त्यांना त्यांची शिकार बनवतात.
असे बरेच लोक आहेत जे आत्मे, अलौकिक शक्ती आणि आसुरी शक्ती यांसारख्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत, आणि हे सर्व खोट आहे किंवा अंधश्रध्दा आहे म्हणून टाळून देता परंतु हे देखील सत्य आहे की अशा गोष्टींना नाकारून किंवा टाळून सत्य बदलत नाही.
शिवपुरी, भोपाळ येथे असलेला 2100 वर्ष जुना किल्ला पूर्वी एकेकाळी खूप आनंदमयी असायचा. मात्र आता रात्री किंवा दिवसा येथे येण्याचे धाडस कोणी करत नाही. रात्रीच्या वेळी येथे घुंगरूंचा आवाज येतो, जो दूरवरच्या लोकांना ऐकू येतो, असे लोक सांगतात.
स्थानिक लोक म्हणतात की जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा येथे एक मेळावा भरतो, ज्यात भूत-आत्मांचा समावेश होतो आणि ज्यांनी तो मेळावा पाहिला ते लगेच मरण पावतात.
पोहरी हे शिवपुरी, भोपाळमधील एक लहान शहर आहे, जिथे हा किल्ला आहे. या ठिकाणाबद्दल कोणालाच माहिती नव्हते, पण जेव्हापासून इथे घडणाऱ्या संशयास्पद घटना मीडियामध्ये प्रसिद्ध झाल्या, तेव्हापासून इथे काहीतरी गडबड आहे हे लोकांना समजू लागले.
ज्यांचा भूत-प्रेत यासारख्या गोष्टींवर विश्वास नाही, तेही आता या किल्ल्याला शापित मानू लागले आहेत. या ठिकाणाला स्वतःची अशी कोणतीही ओळख नाही, पण जेव्हापासून या गडाच्या भुताची बाब समोर आली आहे, तेव्हापासून लोक पोहरी या गावाला ओळखू लागले आहेत. पूर्वी या किल्ल्यात दिवसा शाळा चालत असे, पण मुलांना तिथे काही चित्र - विचित्
र हालचाली दिसू लागल्या व काही वेगळ्या घटना घटू लागल्याने तिथे घेण्यात येणारी शाळाही थांबवली गेली.
हा किल्ला वीर खंडेरावांचा असून येथे जमलेला मेळावा म्हणजे वीर खंडेरावांची सभा असल्याचे लोक सांगतात. रात्रीच्या वेळी ते त्यांचे सहकारी आणि मनोरंजन करणारे नर्तकिंसह एकत्र जमतात. इथे रात्रीच्या वेळी हे आत्मे संपूर्ण किल्ल्याचा आणि त्याबरोबर तेथील जागेचा ताबा घेतात आणि दाट झाडींनी वेढलेल्या या जंगलात रात्रीच्या वेळी चुकून कोणी थांबले किंवा राहिले तर त्याचा परिणाम चांगला होत नाही.
2100 वर्षे जुन्या या किल्ल्यावर वीर खंडेरावांची छावणी होती, पण त्यांच्या मृत्यूनंतर एकही कुटुंब येथे राहू शकले नाही, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. एका कुटुंबाने इथे राहण्याची हिंमत केली तर पहिल्याच दिवशी त्या कुटुंबातील महिला विचित्र गोष्टी करू लागल्या, विचित्र वागू लागल्या मग त्यांना तंत्रविद्येने बरे केले गेले.
काही लोक असेही म्हणतात की या किल्ल्यात खजिना लपवलेला आहे, आणि त्याची रक्षा हे सर्व आत्मे करतात, पण सत्य काय आहे हे शोधण्याची हिंमत कोणी करत नाही.
माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुमचा या गोष्टींवर विश्वास असो किंवा नसो, पण कदाचित तुमचा या ठिकाणी किंवा या सारख्या अजून वेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग आला तर अशा जागेपासून लांब रहा...
टीप : माझा कोणत्याही व्यक्तीला किंवा जागेला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे आणि अंधश्रध्दा पसरवण्याचा तर अजिबातच मानस नाही आहे, मी मिळवलेल्या माहितीनुसार ही कथा तुमच्या समोर मांडली आहे. काही तक्रार किंवा संबंधित जागेविषयी काही अजून माहिती असल्यास जरूर कळवावे...