शुद्ध बीजापोटी !फळे रसाळ गोमटी
शुद्ध बीजापोटी !फळे रसाळ गोमटी


आमच्या घरात माझी आजी फार पूर्वीपासून म्हणजे आम्ही भावंडं लहान लहान असताना पासून म्हणा किंवा आमचा जन्म पण झालेला नसेल बहुतेक तेव्हापासून श्रीकृष्णाचे अवतार श्री चक्रधर स्वामींना मानत किंवा पुजत आलेली आहे. तसेच आजीला स्वाध्यायची पण खूप गोडी अजून पण आहे, म्हणून माझ्या आजीचे काहीही शिक्षण नसताना देखील संपूर्ण हरिपाठ हा तोंडीपाठ आहे. तसेच श्रीमद् भगवद्गीतेमधील बरेचसे श्लोक सुद्धा अर्थासहित आजींना तोंडपाठ आहेत. तसेच इतर देवांच्या गोष्टी, गरुडपुरान आणि असे बरेचसे धर्मग्रंथ आणि अजून बाकी पुस्तकातील सुद्धा भरपूर बाबी आजीला माहिती आहेत.
आणि हे सर्व आम्ही शिकावं, त्याच अनुसरण आम्ही करावं, त्याचा अर्थ आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही आमच्या आयुष्यात त्याचा पुरेपूर उपयोग म्हणा किंवा ते रुजवून घ्यावं यासाठी आजीने आम्हाला लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या. लहानपणी शाळेत हुशार असेलेलो आम्ही आजीने शिकवलेल्या त्या गोष्टी एक प्रकारचा अभ्यास म्हणून करून तर घेतला पण त्याचा अर्थ आणि कोणते कर्म केल्याने काय फळ मिळेल ? किंवा काय केल्याने काय होईल व काय केल्याने काय नाही होणार या सर्व गोष्टी आता मोठे झाल्यावर आम्हाला त्या कळत आहेत किंवा आम्ही त्या अनुसरण करत आहोत.
जस भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेत सांगितलं आहे
की,
१) कर्म कर फळाची चिंता करू नको.
- म्हणून आम्ही जेवढं होईल ते तेवढे चांगले कर्म करीत आहोत शिवाय याच्या की याबद्दल आम्हाला खूप सारी संपत्ती किंवा द्रव्यलाभ होईल या दृष्टीने कोणतेच काम करत नाहीत.
२) जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे ते चांगले होत आहे, आणि जे होणार ते चांगलेच होणार.
- आमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेल्या त्या चांगल्या असो किंवा वाईट आम्ही तो आमच्याच पूर्वजन्मातील कर्माचा एक भाग म्हणून सोडून दिला, आणि ज्या गोष्टी घडत आहेत किंवा घडणार आहेत त्या आम्ही पूर्णपणे परमपिता परमेश्वरावर सोडून दिल्या आहेत.
३) प्राणीमात्रावर दया करा.
- याबाबतीत तर मी माझे आईवडील माझे भाऊ खूप सेन्सिटिव्ह आहोत, आम्ही स्वतः घरात मुक्या जीवांना लहानच मोठ करत आहोत आणि कोणी बाहेर त्यांच्याशी क्रूरपणें वागत असेल तर आम्ही ते करू देत नाही.
4) धर्मो रक्षती रक्षिता...
- आपण आपल्या धर्माची रक्षा केली तर धर्म आपली रक्षा करेल.
अजून बऱ्याचशा बाबी आम्ही पूर्ण परिवार अंगिकरतो आहे जे इथे लिहिले तर शब्द अपुरे पडतील...!
म्हणून माझी देवाचरणी एकच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेव आणि भरकटलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखव...