STORYMIRROR

Sagar Jadhav

Horror Inspirational

3.4  

Sagar Jadhav

Horror Inspirational

शनिवार वाडा

शनिवार वाडा

2 mins
359


पुण्यातील शनिवार वाडा खूप प्रसिद्ध आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकतं असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो. शनिवारवाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे.

या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16, 110 रुपये लागत आली होती. या महालात एक हजाराहून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले.

या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायण राव, जे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायण रावांना धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायण राव पूर्ण महालात “काका मला वाचवा”..... “काका मला वाचवा” असे ओरडत होते. परंतू त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. नारायण रावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोकं म्हणायचे.

नारायण रावांचा आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असतो आणि त्यांचे शेवटचे शब्द “काका मला वाचवा” हेही लोकांना ऐकू येतात. अंधारात हे महाल अजूनच भीतिदायक वाटतं. आणि म्ह

णूनच या गोष्टीमुळे वाड्यामध्ये संध्याकाळ नंतर जाण्यास मनाई आहे.

पण या व्यतिरिक्त महालाच्या भीतींवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत. या महालाच्या पहिल्या मजलावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मुर्त्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता.

शनिवार वाड्यात पाच दारं आहेत. जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात.

पण ही भुताटकीची गोष्ट सोडता बाकी पूर्ण वाडा हा बघण्यासारखा आहे, पण जेव्हा वाड्याला आग लागली होती तेव्हा वाड्याचा छताचा भाग आणि भिंती पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे पण वाड्याचे आरामगृह, स्नानगृह, ज्या ठिकाणी पेशवे सल्ला मसलत करायचे आणि अजून असे बरचसे भाग हे अजून पण आहेत त्या स्थितीत आहे आणि बघण्यासारखे आहेत, म्हणून ज्यांनी कोणी बघितला नाही त्यांनी आयुष्यात एकवेळ तरी बघावा...


मी स्वतः जेव्हाही पुण्याला जातो तेव्हा नक्की शनिवारवाडा बघायला जातो...


माझा कोणत्याही व्यक्तीला किंवा जागेला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे, कृपया काही तक्रार असल्यास किंवा काही चुकीची माहिती आढळल्यास जरूर कळवावे.


✍️ सागर जाधव 


Rate this content
Log in