दिल्ली कॅन्ट
दिल्ली कॅन्ट


सत्य घटनांवर आधारित मालिका
भाग - २ - "दिल्ली कॅन्टोन्मेंट रोड"
मी तुम्हाला जी कथा सांगत आहे ती भारताची राजधानी दिल्लीतील एका झपाटलेल्या रस्त्याची आहे. दिल्ली हे एक स्मार्ट सिटी आहे. जिथे तुम्हाला सर्वत्र शहरांची चकाकी दिसेल. जी एक स्वच्छ राजधानी सुद्धा आहे.
ज्याला लोक "दिल्ली कॅन्टोन्मेंट रोड" म्हणतात त्याला भुताचा रस्ता देखील म्हणतात. मोस्ट हॉन्टेड प्लेसमध्ये दिल्ली कॅन्टचा समावेश होतो.
रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर पांढरी साडी नेसलेली एक महिला लोकांकडे लिफ्ट मागते हे तुम्ही भुताटकीच्या सिनेमांमध्ये पाहिलं असेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे दिल्ली कॅन्टोन्मेंट रोडचे सत्य आहे.
येथून जाणारे लोक सांगतात की, रात्रीच्या वेळी पांढरी साडी घातलेली एक महिला तिथून ये-जा करणाऱ्या लोकांकडून लिफ्ट मागते. तो काळ खूप भयावह आणि भीतीदायक असतो. कारण लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. की ती काही सामान्य स्त्री नाही. जेव्हा कोणी गाडी थांबवत नाही तेव्हा पांढरी साडी नेसलेली ती बाई गाडीच्या मागे लागते आणि एक भीषण अपघात घडवून आणते.
रस्ते आपल्याला आपल्या ठरवलेल्या स्थानापर्यंत घेऊन जातात. पण त्यातील काही मार्ग असे आहेत जे आपल्याला आपल्या ठरवलेल्या स्थानापासून दूर करतात आणि आपल्या जीवनाचा शेवटचा प्रवास बनतात. दिल्ली कॅन्ट हे झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे भुताटकीच्या घटना घडल्याने हा रस्ता अधिकच भयावह बनतो. तुम्हालाही दिल्ली कॅन्ट रोडवरून जायचे असेल तर काळजी घ्या, कारण नशिबाने साथ दिली तर हा तुमच्या आयुष्यातील रोमांचक निर्णय असू शकतो आणि नशिबाने साथ नाही दिली तर शेवटचा निर्णय सुद्धा असू शकतो.
दिल्ली कॅन्ट रोड हा दिल्लीतील सर्वात भुताटकीचा रस्ता मानला जातो. पांढरी साडी घातलेल्या महिलेचा दिल्ली कॅंट रोडवर मृत्यू झाला असावा, असे लोकांचे म्हणणे आहे. तेव्हापासून त्याचा आत्मा दिल्ली कॅन्ट रोडवर फिरतो. जे दिल्ली कॅन्ट रोडला भुताटकीच्या जगात नेते.
पांढऱ्या साडीतील महिलेने लिफ्ट मागितल्यावर दिल्ली कॅन्टमधून जाणाऱ्या ज्या लोकांनी गाडी थांबवली आणि त्या महिलेला लिफ्ट दिली त्या लोकांचा आजतागायत शोध लागला नाही. जी व्यक्ती गाडी थांबवत नाही, त
ेव्हा तो आत्मा खूप रागावतो आणि अतिसुसाट वेगाने गाडीचा पाठलाग करतो आणि पुढे त्या गाडीचा भयंकर अपघात घडवतो. असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा दिल्ली कॅन्ट येथे अपघात झाला नसेल.
दिल्ली कॅन्ट रोडची अजून एक लोकप्रिय कथा आहे, त्यामुळे आजही लोक दिवसा दिल्ली कॅन्ट रोडवर जायला घाबरतात. खूप दिवसांपुर्वीची गोष्ट आहे की, रात्री एक माणूस दिल्ली कॅन्ट रोडवरून त्याच्या गाडीने जात होता आणि अचानक थंडी वाढली आणि थंडगार वारे वाहू लागले. त्या व्यक्तीने याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि पुढे जाऊ लागला.
तेवढ्यात अचानक त्याला कोणाचा तरी हात दिसला जो लिफ्ट मागण्यासाठी पुढे केला होता. त्या व्यक्तीने बारकाईने निरीक्षण केले असता पांढरी साडी घातलेली एक महिला उभी असल्याचे दिसून आले. केसांनी तिचा पूर्ण चेहरा झाकला होता. मग त्याने गाडी थांबवली पण त्याचवेळी बाईने तिच्या चेहऱ्यावरील केस काढताच तिचा भयंकर विद्रूप असा भयानक चेहरा पाहून तो माणूस खूप घाबरला आणि गाडी सुरू करून भरधाव वेगाने पळवू लागला.
काही अंतर गेल्यावर त्याला वाटले की आता आपण धोक्यातून बाहेर आलो आहोत. पण जेव्हा त्याने पुन्हा आरशात पाहिले तेव्हा तो आणखीनच घाबरला कारण पांढऱ्या साडीतली ती बाई त्याच्या गाडीमागे धावत होती, आणि हे बघून त्याने गाडीचा वेग कमी अजून वाढवला आणि परत मागे वळून न बघता गाडी चालवत राहिला. जेव्हा दिल्ली कॅन्टोन्मेंट रोडची सीमा संपली तेव्हा त्याने बघितले असता ते पांढऱ्या साडीतले भूत गायब झाले होते.
पांढऱ्या साडीतील ती बाईची आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट रोड यांच्यावर घडलेल्या ह्या घटना वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये खूप गाजली. दिल्ली कॅन्टोन्मेंट रोडवर जाण्यास लोक संकोच करू लागले आणि आजतागायत "दिल्ली कॅन्टोन्मेंट रोड" हा भुताचा रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे.
या गोष्टीत किती तथ्य आहे याचा ठोस पुरावा नाही. ज्याने याचा अनुभव घेतला आहे तो दिल्ली कॅन्टच्या भुताच्या कथेची साक्ष देऊ शकतो. मात्र आजही दिल्ली कॅन्टमधून जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी, दिल्ली कॅन्ट आणखीन पछाडले जाते.
तुम्ही जर दिल्लीचे असाल किंवा बाहेरचे असाल तर तुम्ही कधी ना कधी दिल्ली कॅन्टला गेलाच असाल आणि जर गेला नसेल तर दिल्ली कॅन्टला नक्की जा आणि या भुताटकीचा अनुभव एकदा नक्की घेऊन बघा पण सर्वस्वी तुमच्या जबाबदारीवर....
✍️ सागर जाधव