Rajesh Sabale

Tragedy Others

3  

Rajesh Sabale

Tragedy Others

लाल्या (कुत्रा)

लाल्या (कुत्रा)

2 mins
188


पन्नास साठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्याकडे लाल्या नावाचा एक कुत्रा होता.. त्याला कुत्रा कसं म्हणावं असा प्रश्न पडावा असा लाल्या..जशी माणसं वागतात तसा तो वागायचा...आमचं एकत्र कुटुंब होत..त्यामुळे शेळ्या आणि गाई भरपूर होत्या त्यांना चारण्यासाठी रोज डोंगरावर किंवा डोंगर जवळच्या टेकडीवर जावे लागत आडे.... रोज आमचे वडील हे काम मारीत पण रविवारी आम्हा मुलांना हे काम करावे लागे.. त्यावेळी नेहमी प्रमाणे हा लाल्याही सोबत असे... आता तूम्ही म्हणाल लाल्याच काय काम?...लाल्या नसलं तरी जनावर सांभाळणार कोण? तो सोबत तरच पोर जाणार....

सर्व जनावरांमध्ये आणि माणसांपेक्षाही अतिशय प्रामाणिक प्राणी म्हणजे लाल्या... 

सर्व जनावरांमध्ये चाहटळ प्राणी म्हणजे शेळी आणि तिची बकरे..कधी गुरख्याचा डोळा चुकवून दुसऱ्याच्या शेतात जाऊन उगवणाऱ्या पिकाचा शेंडा खाऊ मोकळी होणार ते कळणार नाही. पण यांना वठणीवर आणण्यासाठी लाल्या उपयोगी पडे..

गुराखी पोरं खेळण्यात रमली की लाल्या शेळ्या आणि गुरे राखण्याचे काम करीत असे...मग एखादी गाई असो नाही तर शेळी गवत खायचं सोडून कोणाच्या शेतातल्या पिकात गेली की, लाल्या त्यांच्यावर जोरात भुंकत जाऊन, त्यांच्या नका वर पंजा मारी आणि नाही ऐकलं तर दात विचकावून जस काही आता नाकाचा चावा घेतो की, असा अवतार धारण करी....

मग पोरं पळत जाऊन जनावरांना पुन्हा डोंगर रानात चरण्यासाठी हकलीत असतं...

कधी कधी तर, सकाळी घरातल्या लोकांना भाकर करायला उशीर झाला तर, लाल्या मागे राही आणि मागावून भाकर आणि चटणी पडक्यात गुंडाळून आईने लाल्याच्या गळ्यात बांधली की, लाल्याच्या स्वारी डोंगराकडे निघे...बरोबर जिथं रोज गुर आणि शेळ्या चरायला जातात तिथं भाकरी घेऊन येत असे...पण जर कोणी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला तर, त्या माणसावर दात विचकावून चालून जात असे..

एवढंच नाही तर, सुगीच्या दिवसात खळ्यात धन्य उघड्यावर पडलेले असे.. त्याच राखण सुध्दा लाल्या करीत होता...एखादं जनावर किंवा चोर आला तर, लाल्या उंच गवताच्या गंजीवर किंवा सुडीवर (सुडी म्हणजे शेतातल्या पिकाच्या पेंढया बांधून त्या एकत्र करून रचतात त्याला सुडी म्हणतात) जाऊन मोठं मोठयाने भुंकून लोकांना जागे करी... मग लोक जगे झाली की, तो शसंत पणे पडून राही..अतिशय गुणी इमानदार प्राणी होता लाल्या.. घरातल्या लहान मुलांना कधी त्याने दंश केला नाही..बरं अंगाने मजबूत असल्याने आजूबाजूचे लोक त्या वचकून असतं... आपलं कोण आणि परकं कोण तो नुसत्या वासाने...रातीच्या काळोखात बरोबर ओळखत असे....काय झालं कोणास ठाऊक एक दिवस भाकर खाण्यासाठी लाल्या खळ्यातून घरी येत होता..दारातून घरात पाऊल टाकणार तेवढ्यात वाघाने त्याला पटकन मागे ओढले..फक्त किंचाळल्याच्या आवाज आला... बाहेर मिट्ट काळोख होता... के झालं लाल्या का ओरडला..म्हणून लोक धावून आले पण......

तो गेला पण घरात काही दिवस अतिशय दुःखात गेले... लहान मुलं आणि मोठी माणसं गप्प गप्प होती...सतत त्याची आठवण येत राही... म्हणून त्याच्यासारखा दुसरा कुत्रा आणला होता.. तोही असाच निघून गेला..पण त्यानंतर.. लाल्यासारखा दुसरा आजपर्यंत मिळाला नाही... पूर्वी एकत्र कुटुंब होती.. म्हणून घरात माणसं भरपूर असतं. तरीही लाल्याच असं अचानक जाणं जीवाला चटका लावून गेलं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy