Rajesh Sabale

Inspirational

4  

Rajesh Sabale

Inspirational

गुरुजींना पत्र

गुरुजींना पत्र

4 mins
292


।।गुरुजींना पत्र।।

नमस्कार आनंद वेताळ सर, वि वि 

मी राजेश साबळे, ओतूरकर तुमचा कलाप्रेमी विद्यार्थी. बऱ्याच दिवसांनी आपणास पत्र लिहीत आहे. 

सर, ते पावसाळ्याचे दिवस होते. आपण वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी घेतत होता. त्यानंतर आपण आमची ओळखपरेड आणि प्रत्येकाची आवड विचारली होती. मी,म्हटलं 

'चित्रकला.' सर्व वर्ग खदखदून हसला होता. 

मी तर दचकलोच. मला वाटलं आपण रागवाल. पण तसं घडलं नाही. उलट आपल्या जीवनात कला किती महत्वाची आहे. कला आपलं जीवन कसे समृद्ध करते हे समजून सांगितलंत.

आजही आठवतो. त्यानंतर शासकीय चित्रकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला बसण्यासाठी आपण मुलांना मार्गदर्शन करीत होता. पण या शासकीय परीक्षा केंद्र त्यावेळी जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्याचा पायथ्याजवळ बुट्टे पाटील हायस्कूल मध्ये होते. त्यासाठी वेगळा खर्च होणार होता. म्हणून सायकल किंवा पायी प्रवास करून आला तरी चालेल. आम्ही तीन चार विद्यार्थी ओतूर ते जुन्नर पायी प्रवास करून आलो होतो. फोन व्यवस्था नसल्याने आपणास खूप काळजी वाटत होती. आम्ही येई पर्यंत आपण बाहेर रस्त्यावर उभे होता. तुमच्या सोबत लोखंडे हा विद्यार्थी होता. लोखंडे खूप टारगट पण त्यालाही आपण शिक्षा न करता सरळ केला होता. पण खोडकर मुलं असतात त्यांची सवय त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 

रात्री एका वकिलाच्या घरातील माडीवर दोन दिवसासाठी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा भाड्याने घेतली होती. जेवणाची व्यवस्थाही याच वकील कुटुंबाने स्वीकारली होती. 

रात्रीच जेवण झालं होतं. सर्व विद्यार्थी वकिलांच्या खोलीत जमले होते. खोली कसली चांगला मोठा हॉल होता तो. आम्ही सर्व जमीन बसलो होतो. सर्वांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम होता. 

सर्व एकत्र जमल्यावर सरांनी सर्वांना शांत बसण्याची विनंती केली आणि वकील साहेब आपली पलख करून घेणार आहेत. तर, सर्वांनी शांत बसा..

वकील साहेब म्हणाले .

आता दोन दिवस तुम्ही आमचे पाहुणे आहात. तेंव्हा आपण एकमेकांची ओळख करून घेवू या.' सर्वांनी ओळीने आपापली नावे सांगा.' त्यानंतर मी आपली सर्वांची नावे ओळीने सांगणार आहे. वकील म्हणाले.. आपण मला ऐकू येईल अशा खणखणीत आवाजात नावे सांगा. चला तर आता शांत बसा..

आम्ही सर्वांनी ओळीने आपापली नावे सांगून झाल्यावर सरांनी आपले नाव, अनिव आवड सांगितली. 

सर्वांची नावे सांगून झाल्यावर वकिलांनी आपली माहिती सांगितली आणि मग म्हणाले बघा मी आता तुमची नाव ओळीने सांगतो बरोबर की चूक तुम्ही सांगा..

वकीलनी खरोखरच एकामागे एक नाव सांगत आहेत अस वाटल. कारण हे नवीन टेप रेकॉर्डर त्यांनी घेतला होता. तो पर्यंत ही काय भानगड आहे आम्हाला कळली नाही. कारण हा प्रकार आम्ही या आधी कधी पहिलाच नव्हता.. 

आता तर, झाडू मारणारा, घरकाम करणाऱ्या आणि भांडी घासणाऱ्या लोकांकडे मोबाईल आहे. १९६५ ६६ साली टेप रेकॉर्डर फक्त मोठ्या शहरात आणि श्रीमंत मंडळींकडेच होते. बाकी नुसते बातमी म्हणून ऐकत होते. हा सर्व प्रकार पाहून काही वेळ सर्व शांतपणे ऐकत होते...

अंधार दाटला होता बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. काही म्हणाले जरा फिरून येवून. सर म्हणाले गप्प झोपा कोणी कुठं जायचं नाही हे आपल गाव नाही. पण वात्रट मुल गप्प बसतील तर, ते त्यांना वात्रट कोण म्हणेल.. 

लोखंडेने कोणाच्या तरी बागमधून हळूच छत्री काढली आणि चोर पावलाने दार उघडणारे तेवढ्यात सरांनी जोरात कानाखाली सपकन ओढली. आणि लोखंडे छत्री उघडायचा अगोदरच दारावर आदळला.. छत्रीही तुटली. सर्व चिडीचीप डोक्यावर पांघरूण घेवून झोपले.. झोपले कसले. कधीच हात न उचलणारे वेताळ सरांनी खरोखर आडनावाचे सार्थ केले असं वाटल. कोणी काहीच बोलले नाही..

सकाळी पुन्हा लोखंदेनी गोंधळ घटलाच..

काय झालं होत. सकाळी सकाळी नाश्ता काय? तर कोणी म्हणाले मुत भात.. आणि एकच हशा पिकला. खर म्हणजे मुदभात असा तो शब्द होता. पण ऐकण्यात फरक झाला होता. खर मी तर, हा प्रकार कधीच ऐकला नाही. मला तो शब्दच सारखा राहून राहून तो शब्द ऐकून हसू आवरत नव्हता..

अशा या गंमती.. वेताळ सरांनी कधी कोणावर हात उचलला नाही पण त्या दिवशी त्यांचा राग अनावर झाला.. 

आपण दुसऱ्याच्या घरी आहोत. आपला आदर्श लोकांना दिसायला हवा अस त्यांना वाटे. चुकून काही झालं तर, शाळेचे नाव त्यासोबत गावच नाव आणि पर्यायाने शिक्षकाची इमेज घराब होते. अतिशय गरीब कुटूंबात त्यांचे जीवन गेले असल्याने परिस्थितीची जाणीव होती. म्हणून कुठे कसे वागावे हेही तितकेच महत्वाचे आहे.

त्यांनी घालून दिलेल्या विचारांच्या आधारावर आजही आमच्या सारखे काही जीवनाची जगत आहेत.. आपण सांगितल्या दिवसापासून आजतागायत मी कला विश्वात जगत आलो. पुढे शिक्षणात परिस्थितीमुळे उच्च घेताना अडचणी आल्या पण, मित्र , नातेवाईक आणि आपले मारदर्शन यामुळे शिक्षण झाले, नोकरी मिळाली, नोकरीत पारितोषिके आणि सन्मान मिळाले. सध्या सेवानिवृत्त झालो आहे. पूर्वीपासून कथा कवितांचा छंद होता. तो आता जोपासतो आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रांतही खूप पारितोषिके, सन्मान प्राप्त झाले. आणि होत आहेत. हे सर्व आपल्या मार्गदर्शनामुळे झाले. त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.

 सर, तुमचा मोठा मुलगा आता चांगला नामांकित डॉक्टर आहे. मी गावी आल्यावर त्याच्याकडे तुमची चौकशी करीत असतो. आपण आता गावी शेत करता असं म्हणत होता. आपण सुखी असावे. कलेबरोबर साहित्याची सेवा करायला मिळते आहे. मी खूप आनंदी आहे. तब्बेतीस जपावे. ताईंना माझा नमस्कार...

पत्र मिळताच पत्र पाठविणे मी, वाट पाहत आहे.

तुमचा विदयार्थी



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational