गण्याची बायको
गण्याची बायको
गण्याची आई सकाळी गण्याच्या बायकोला म्हणाली...
"सुंद्रे आता कव्हर उतान पडायचं. आजच्या दिस अंथरूण पांघरूण काढायचं हाय का नाय? दिस कासराभर वर आला तरी अजून गोधडीत लोळत पडलीस. नव्या नवरीन कसं लवकर उठव अंगणात झाडलोट करावी. तर अजून लोळत पडली मेली..चल उठ बीगी बीगी अन् शेळीच दूध काढून आण पटकन"..गण्याच्या असून पहिल्याच दिवशी गण्याचा बायकोला फटकारलं..
मग काय माऊली..सुंद्री आळोखे पिळोखे देत कस तरी डोळे चोळत उठली.. गेली सैपाक घरातच तिकड पाहिल्यावर तिला सासूने रात्री पातेल्यात झाकून ठेवलेलं पटेल दिसलं ते तसचं घेवून सासू बाईकड गेली..
सासू म्हणाली हे काय?
दूध..हवं व्हत ना,? गण्याची बायको म्हणाली..
"हे काय? लगेच दूध कुठून आणलं?
गण्याच्या आईचा प्रश्न .
सूंद्री म्हणाली...
" हैय का आता. तुम्ही तर म्हणलं व्हत शीळ दूध आण म्हणून.".
आता गण्याचा आईचा डोक्याचा पारा अधिक चढला..ती गण्याला हाका मारीत गण्याला म्हणाली..
"गण्या आ रं लेका ही बहिरी म्हैस कुठंन आणली रं बाबा"?
गण्या काही कळणा तो आईला म्हणाला..
"बाबानं बहिरी म्हैस आणली मला काय म्हाईत. आणि कुठनं आणली तेबी नाय ठावं "
आता म्हातारपणात हरिनाम करायचं सोडून हे बाबा बी ना कशाला गुर ढोर गोळा करतय काय माहित..वाईच गप्प राव्हा की म्हणावं."
गण्याचं बोलण ऐकून गण्याच्या आईला आला राग तिनं घेतल चुल्हीतल जळक लाकूड अन् लागली गण्याच्या माग.. तवा गण्या गया वया कृत म्हणाला..
"अग अग आई हे काय करती. काय झालं ते तरी सांग. तवा गण्याची आई गण्याला म्हणली..
मी तुझ्या बायकुबद्दल म्हणतो तर, तू बाबानं म्हैस कवा आणली मला म्हाईत नाय म्हंतस..
तेंव्हा गण्या म्हणाला...
अग आई. झालं काय ते तरी, नीट सांग की, आता माझ्या बायकुच काय तीन काय केलं.. एकदा म्हास म्हंतीस, एकदा बायकु म्हंतीस काही तरी, नीट इस्कटुन सांग की, लोक काय म्हणतील सकाळी सकाळी काय हा
तमाशा...
गण्याचा तमाशा शब्द ऐकून गण्याच्या आईचा संताप अधिक वाढला.
मी तमाशा करतो. का रे उंडग्या मी तमाशा करतो.. असं म्हणत ती जळक्या लाकडान गण्याला मारता मारता म्हणली..
ही भटक भवानी तुला कुट घावली?
"कोण सुंद्रि व्हय.." गण्या म्हणाला..
मंग काय म्या.. गण्याची आई म्हणाली...
तसं न्हाई. गं माय.. डोंगरात शेळ्या राखता राखता वळख झाली.
हे ऐकून गण्याची आई कडाडली..
म्हणली...
"रांडच्या आ रं ती कानान बहिरी हाय की, हे तुला ठाव नाय?
आ... करून गण्या आईकड बघून म्हणाला..
बाबा म्हणतो ते खरं हाय..
काय म्हणतो तुझा बा.. गण्याची आई..
तू डोक्यावर पडली हाय म्हणत व्हता.. गण्या म्हणाला..
"कोण म्या डोक्यावर पडलो म्हणतो तुझा बा...
गण्यान नुसतीच मान नंदी बैलासारखी हालवली..
अन् मग काय गण्याच्या म्हातारीनं गण्याला सोडलं अन् गण्याच्या म्हाताऱ्याला अंघोळीच्या मोरीत घुसून धू धू धुतला.
सकाळी सकाळी हे काय नवीन संकट म्हणून गण्याचा बाप अर्धवट अंघोळ करायची सोडून अंगणात पळाला..गण्याची माय त्याच्या मग धावली..
उघड नगड कोण पळतय म्हणून आजू बाजूची कुत्री गण्याच्या बापावर तुटून पडली. गण्याचा बाप पुढं अन् कुत्री मग ही शर्यत सुरू झाली.. हे चमत्कारिक दृश्य पाहून गण्याची ओरडली धावा धावा...त्या गडबडीत एका कुत्रानं गण्याच्या बापाचं धोतर पकडलं अन् टरा टरा फाडलं. आणि बाकीची कुत्र्यांनी त्या फाडलेल्या धोतराच्या पार चिंध्या चिंध्या केल्या इकडे अंगणात तोवर बाजूची मंडळी गोळा झाली होती. आणि गण्याचा बाप अर्धवट फाटलेले ओल धोतर हातात पकडुन उरली सुरली अब्रू कशी बशी गोल गोल फिरत झाकीत होता. अन् गण्याची आई, तोंडाला पदर लावून तर, गण्याची बायको सुंद्री, आणि गण्या दरात उभं राहून खदा खदा हासत व्हती. आणि गण्याचा बाप केविलवाणा चेहरा करून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत रस्त्यावर उभा होता..