Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

तो पहिल्यासारखा येत नाही..

तो पहिल्यासारखा येत नाही..

6 mins
82


आता तो पहिल्यासारखा येत नाही. डोक्यावर आणि अंगा-खांद्यावर खेळत नाही..म्हणून अंगाला शिरशिरी आणत नाही आणि खट्याळ वाराही तितकासा आता अंगाला झोंबत नाही. माळशेज घाटातून जाताना बोगद्याजवळ तर असा धावत येत होता की, कधी कधी वाटायचं आता तू कडेवर उचलून घेतोस की काय.. असा भास व्हायचा.. महिना महिना दोन दोन महिने डोंगराच्या कडेपारीतून हळुवार रेंगाळताना फिरताना आम्हाला दिसायचा. 

किती छान होत सारं... खूप आनंद होत असायचा... असं वाटायचं की, आपण आकाशात विहार करीत आहोत.. आजू बाजूला धुक्याशिवाय काहीच दिसायचं नाही..तेंव्हा तू सोबत घेऊन आणलेल्या धुक्यातून आम्ही वाट काढीत कसा बसा रस्ता शोधायचा.. आता फक्त धुक असतं...तू कुठं दिसत नाहीस...


पूर्वी कसा तळ कोकणात ठाणे, मुंबई, पालघर इथं महिना पंधरा दिवस तळ ठोकून असायचा, मग घाटात येऊन असा मुक्काम असा ठोकायचा की वाटायचं.. पूर्वी जसा शिवरायांच्या काळात गड किल्ले घेण्यासाठी शत्रू सैन्याचा किल्ल्याला वेढा पडायचा. तस्स वाटायचं.. मग सैनिक थकून जात. अन्नपाणी संपून जायचं...तेंव्हा नको ते युद्ध वाटायचं अन किल्लेदार मात्र आपसूक शरण येई असे..तसच आमचं होत असे..


एकदा तर तू असा कोसळत होता. की काही विचारू नको.. तू दहा पंधरा दिवस सारखा येत होतास.. म्हणून कुठं जात-येता येत नव्हतं सारखी रिपरिप सुरू होती.. गवताच्या पेंढ्याच आमचं घर ते सारच गळायचं. बसायला जागा नसायची, तेंव्हा आई म्हणायची ..


'हा बाबा काय असा जायाचा न्हाई.. याला जरा पोळवून घालवते (भाजवणे, किंवा चटका देणे) काय?


मग आई घरातल्या लहान पोराच्या अंगावरचे सर्व कपडे काढून त्याला नग्न करी. त्याच्या हात चिमटा देवून, चुल्ह्यातील इंगळ (विस्तव) देई.. भर (पावसाला) तुला चटका देण्यासाठी आंगणात पाठवीत असे..हे मी पाहिलं आहे.. आता तुला चटका दिल्यावर तू जात होता की, नाही.. ते माहीत नाही पण आई मात्र असं करायची..तिच्या मनाच्या समाधानासाठी असेल कदाचित.. पण आता तू या चार पाच वर्षात आमच्या माळशेज घाटातून वर जुन्नर तालुक्यात म्हणण्यापेक्षा उत्तर पुणे जिल्ह्यात आणि आस पासच्या गावात वाडी वस्तीवर शेतात डोंगरात रेंगाळताना दिसत नाहीस... 

नाही म्हणजे तू रुसलास की, मुद्दाम येत नाही, हे कळत नाही ना!! की आमचं काही चुकलं म्हणायचं..का? 


आता हेच बघ आमच्या तालुक्यात जवळपास पाच धरण बांधलीत का? तुला माहित नाही? असं का म्हणून विचारू नको..अरे बाबा १९७२ च्या अगोदर तर तू आमच्याकडे डोकावून बघत नव्हतास मला चांगलं आठवत बरं ...इतका त्रास देत होतास की, पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा बैलगाडी घेऊन तुला पाणी आणायला लागायचं.. का तर तू वेळेवर येत नव्हतास.. जमीन भिजयची नाही मग शेतात पीक कसं येणार आणि तू वेळेवर येत नशीस, मग जमिनीत पाणी येणार कुठून ते जिरणार कसं आणि विहिरी बारवा उन्हाळ्या कोरड्या ठाक पडायच्या मग आम्ही पाण्यासाठी वणवण फिरायचो... पोटाची भूक आणि तहान भागविण्यासाठी सरकारी रोजगार हमी योजनेच्या कामावर जायचो.. तिथं पियाला पाणी आणि दुपारी खायला सुकडी मिळायची..तेवढाच जीवाला आधार..


त्यानंतर सरकारी योजनेतून आमच्या तालुक्यात पाच धरण झाली खूप विरोध झाला..गावच्या गाव उठली आणि जमिनी पाण्याखाली गेल्या कित्येकांचे संसार मोडले काही त्यातूनही तरले.. त्यानंतर आमच्याकडे मुबलक पाणी मिळायला लागलं तेच पाणी पुढे नगर सोलापूर या दुष्काळी भागात धरणाच्या पटातून आणि काही नदीच्या पत्रातून जात होतं कधी दमदाटी करून घेऊन जात.. पण बरं चाललं होतं...आता तुझं येणं-जाण वाढलं होतं.. खूप सुखी समाधानी होती माणसं.. माळशेज तर, तुझ्या आगमनाने खूप फुलन जात होता.. मुलं माणसांनी आलेल्या पर्यटकांनी फुलून जात होता...तू आलास की, डोंगर, दर्या, माळरान हिरवा शालू परिधान करून नव्या नवरी सारखी नटायची, फुलायची, डोंगराच्या कड्यावरून ओहळ उड्या मारत येत आणि त्याच्या


खाली बसून आम्ही सारी ओलेचिंब होत होतो.. पण आता तुझं येन होईना...

तसा तू येतोस पण ही जीवाला घोर लावून जातोस, ऐनवेळी येतोस आलेलं पीक घेऊन जातोस..

मागे एकदा सुनामी झाली. तेंव्हापासून तू आमच्याकडे येन फार कमी केलं आहे..

पण तू जिकडे कधीच वेळेवर गेला नव्हता... नव्हे जातच नव्हतास.. आता तिकडच्या शिवारात वाडी वस्तीत खूप धुमाकूळ घालतो म्हणतात..तिकडचे तलाव, धरणे तुडुंब भरून ओसंडून वाहतात गावच्या गाव आणि मोठी मोठी शहर तू तुझ्या बाहुपाशात घेऊन बुडवून टाकलीस असं का केलंस बरं..काही सांगणार आहेस का? 

'नाही? का बरं एवढा कोल्हाहल केलास धिंगाणा घालून मग त्याच उत्तर तू देणार नाहीस?'

'ठीक तुला विचारायचं म्हणजे लई डोक्याला ताप होतो जाऊ दे तुला सांगायचं नसलं राहू दे, का उगाच नाराज होऊ..तुझी मर्जी नाही का?'

'पण एक विचारू का राहवत नाही म्हणून विचारतो..राग मानू नको!!'

'काय रे पावसा तुझी मानसिक स्थितीत बिघडली आहे काय? आमच्याकडे आम्ही काय करतो सांगू..का?

' कामावर जायचा कंटाळा आला की, खोटी खोटी कारणं सांगून माणसं ऑफिसला दांडी मारतात आणि मस्त पिकनिकला जाऊन येतात.. तसं तुझं नाही ना? पहिला तू आमच्याकडे खूप दिवस मुक्काम करून मग पुढं जात होतास म्हणून म्हटलं...'

'आमच्याकडची तरुण पोरं-पोरी असच करतात..'

'तुला म्हणू सांगतो उगाच बोंबाबोंब करू नकोस.. काय समजले...'

'काय झालंय बरका आता आमच्याकडे स्मार्टफोन आलाय त्यामुळे पोरं पोरी लपून छपून भेटायचं म्हटलं की, एकमेकाला फोन करतात आणि मस्त मजा मारतात... घरून कोणा नातेवाईकांचा फोन आला की, म्हणतात..

'आम्ही शाळेत किंवा कॉलेजात आहोत. किंवा एखाद्या क्लासच नाहीतर दुसऱ्या मित्र मैत्रीचं घरी आहोत असं सांगतात... पण तिथे नसतातच मुळी... ते कुठेतरी दुसरीकडे मस्त हातात हात घेऊन फिरत असतात...

'तुझं तसं तर काही नाही ना? अन तस बी तुला कोण फोन करणार म्हणा!! नाही का? आणि समजा तुला फोन आलाच तर, तुझाच एवढा आरडाओरडा असतो तर, तुला ऐकू येणार कसं...'

'मला वाटतं तुझा ना प्रेम भंग झाला असावा म्हणून तू असा वेड्यासारखा करतोस..'

'हां आमच्याकडे असंच असतं आई-बापानं पोरा-पोरीचं प्रेमाचं लफडं पकडलं किंवा त्याच्या प्रेमाला जाती-पातीच धर्माचा लेबल लावून नकार दिला की, हे प्रेमी एकत्र कुठं पळून तरी जातात..किंवा चोरून लपून लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहतात..आता तू काय लपणार म्हणा तूच घोंगडी पांघरून आरडा-ओरड करीत येतोस ते आम्हाला सारं दिसत हो....पण तुझं हे असं बे भरवशाचा वागणं पटत नाही हो..मी तुला एक विनंती करू काय? 

'तू म्हणे हवामान खात्याचा पार बोजवारा वाजवून मोकळा झालास... अरे बाबा आम्ही त्यावर लाखो करोडो खर्च करतो..त्यासाठी अवकशात मोठं मोठ्या कार्यशाळा बांधल्यात. ग्रह, यानं सोडलीत त्यात सी सी कॅमेरे टीव्ही बसवलेत... 

तू कुठं असतोस, काय करतोस, कुठं जाणार, कधी येणार हे बघायला नको..हां हे सारं तुला कळलं वाटतं!!

'म्हणजे तू तर, आमच्या चोरांपेक्षाही हुशार निघालास हो..'

आमचे लोक सी सी कमेऱ्यावर कापड टाकतात.. नाहीतर फोडतात किंवा बंद करतात...तू तर यातलं काहीच करत नाहीस तरी, आमचं हवामान खात पतंगासारखं...नेहमीच गोता खात.....हे कसं?..

'हं हं बोल ना ..नाही सांगणार... लई हुशार हैस। बाबा.. पण आता तू रुसवा सोड... वेड्या कशाला जीव टांगणीला लावतोस...हे बघ तूला काही सांगितलं तर कळलं ना!!. पण नुसताच राग राग करून इकडं तिकडे नाचत राहिलास तर, काय उपयोग...'

'तुझं कस झालंय .... तुझ्यावर प्रेम करणारी मंडळी आणि तुला त्रास देणारी मंडळी तू एकत्र करून घोळ करु नको... तुला त्रास होतो हे मान्य... पण पाप करणाऱ्या सोबत प्रेम करणाऱ्याला तू त्रास देतोस ना हे बरोबर नाही..'

'का काय म्हणालास?'

'आमच्याकडे दळणात गव्हा सोबत किडे ही रंगडले जातात..आणि ओल्या सोबत सुक जळतो.. आम्ही ना? हा हा खरं आहे ते....'

'अ रे वा म्हणजे तुला बोलता येत'..म्हणायचं..

'मग मी तुमच्याकडूनच शिकलो ना!!

हं हे मात्र खरं आहे म्हणजे आमचीच म्हण तू मला ऐकवलीस वा छान👌👌

'पण ते सारं आता जाऊ दे!! आता झालं गेलं गंगेला मिळालं.. तू नियमित येत जा.. म्हणजे झालं.. अ रे बाबा आमच्याकडे पण मुलं-मुली पळून जाऊन लग्न करतात..तुला सांगितलं ना...एकदा......

आई-बाप चिडतात... ओरड्यात... भांडतात -- कधी कधी मरतात सुध्दा.. अबोला धरतात..पण पळून गेलेल्या जोडप्याला मुलं-बाळ झाली की, आई किंवा बहीण-भाऊ आमच्या बापाला न सांगता चोरून भेटतात रे.. तू कशाला टेन्शन घेतोस..आणि काही दिवसांनी मांडवली करून पुन्हा एकत्र येतात... तुझं कुठंल लफडं आहे तवा... म्हणून म्हटलं...

 'झाली असेल आमची चूक तर घे पदरात आणि मांडवली करून येत जा... झालं...:

'अ रे हे मी तुला काय सांगतोय मी पण काय वेडा आहे..!! तुला कुठं पदर आहे.. तू कसा पदरात घेणार म्हणा...'

बरं ते जाऊ दे एक गंमत केली... पण तू प्रेमान येत जा तुझं मनापासून स्वागत आहे..


Rate this content
Log in