Rajesh Sabale

Tragedy

3  

Rajesh Sabale

Tragedy

गरिबी

गरिबी

4 mins
231


शब्द कोडी सोडविताना बुद्धीची कसोटी लागते. तर आयुष्यातील कोडी सोडविताना सहनशक्तीची कसोटी लागते.

मंडळी, शब्दाचे आणि आयुष्याचे कोडे सोडविण्यासाठीचा विचार हा आपल्यालाही थोडा विचार करायला भाग पाडतो आहे.

 आपण नेहमी पेपर मधून वर्तमानपत्रात वाचतो किंवा पाहतो. अनेक विविध अंगी बातम्या सह खून दरोडे अपघात जाहिराती आणि शब्दकोडी असतात..वृत्तपत्रात येणारी किंवा अन्य पुस्तकातून कोडी सोडवा या सदरात उभे आडवे रकाने असलेकी चौकट त्यात काही जागा भरलेल्या तर काही रिकाम्या असतात. पण अधून मधून काही रकान्यात अक्षर लिहिलेले असते. त्या अक्षराशी निगडित अशा शब्द शोधून ते पूर्ण करावयाचे असते. त्यासाठी पर्याय म्हणून सोबत उभे आडवे दिलेली वाक्य असतात त्यातून योग्य त्या अर्थाचा संबंधित अक्षराशी निगडित शब्द शोधून दिलेल्या रकान्यात योग्य ठिकाणी उभा-आडवा अर्थपूर्ण शब्द लिहिणे यासाठी शब्द संग्रह आणि बुध्दी कौसल्या असावे लागते कारण एकाच शब्द अनेक अर्थ निघू शकतात. जस की, उदा.पाणी-याला समान शब्द जल, तोय, नीर असे शब्द असतात ..म्हणून योग्य अर्थाचा शब्द देणे महत्वाचे..

तसेच आयुष्याचे आहे. आपण जन्माला तर, आलो. पण आयुष्य इतकं सरळ नसते. जीवनात अनंत अडचणी, खाच खळगे असतात.. मग तो गरीब असो की, श्रीमंत....

 प्रत्येकाची अडचण वेगळी पण अडचण ही असणारच.. आपण लहान असतो तेंव्हा आई वडील पालन पोषण करतात. म्हणजे शब्द कोड्यातील जशी अक्षर तशी अधून मधून साथ देतात त्यात मित्र , नातेवाईक गुरु असे अनेक मार्गदर्शक असतात. जन्माला आल्यापासून आपल्या अवतीभोवती अशी नातेवाईक मंडळी पुष्कळ असतात. तेही त्या शब्दकोडातल्या उत्तराप्रमाणे आपल्याला अधून मधून साथ करतात.. तर कधी कधी दगाही देतात. जसं कोणत्या शब्दाला कोणता पर्याय निवडायचा असे शब्द कोणत्या तरी असलं तरी त्याचे अर्थ अनेक होतात.. म्हणून योग्य तो शब्द. म्हणजे योग्य तो माणूस मित्र म्हणून निवडायचा हा अधिकार मात्र आपल्याला असतो..

पुढें शिक्षण घेताना शाळा कॉलेजात गेल्यावर किंवा नोकरी, लग्न, संसार, मुल बहीण भाऊ,सासू सासू-सासरे, आई-वडील नातेवाईक, मित्र असा प्रवास करीत असताना, प्रत्येकाशी जुळवून घेताना मनाचा तोल सांभाळून, आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून, सहनशक्तीचा तोल ढळू न देता, जीवन जगणे हे शब्द कोडे सोडविण्यासारखेच आहे. जीवनात भांडण तंटे, वादावादी, चिडचिड, संघर्ष कोर्ट कचेऱ्या आपल्याल्याला संघर्ष नको असला तरी, दुसरा आपल्यावर कधी चालून येईल हे सागंता येत नाही. तसचं शब्दांच आहे. आपल्या पहिला दिलेला किंवा लिहिलेला शब्द पुन्हा दुसऱ्या अर्थाने लिहिण्याची वेळ येते मग कोणी गरिबी असो की श्रीमंत अडचणी येणारच मग तुमच्याकडे कितीही पैसा संपत्ती असेल तर, आणि नसली तरी..बुध्दी आणि सहनशक्ती वापर करण्याची अक्कल असावी लागते. तरच शब्द कोडे सुटेल आणि जीवन सुखी होईल.

 माझी असंच झाल. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला. पण शेती असून नसल्यासारखी. पाऊस पडला तर शेती पिकाची. नाहीतर बारमाही दुष्काळ. हा आमच्या पाचवीला पुजलेला..

 लहानपणी आम्ही झोपलेले असताना दिवस उगायच्या आत आई-वडील घरातली मंडळीच रोजंदारीवर कामावर जायचे..

 तेव्हा काही कळायचं नाही पण कळायला लागल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. घरा शेजारी शाळा होती म्हणून शाळेत गेलो. गेलो कसला. आई वडील कामावर गेल्यावर इतर मुलांना मी त्रास देतो. असा गैरसमज पसरून मला माझ्या चुलत भावाने शाळेत नाव घातले.

 शाळेतले मास्तर हे आमचे नातेवाईक त्यामुळे जास्त चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. ज्या दिवशी मला शाळेत नेलं ती माझी जन्मतारीख. पण नाव तरी व्यवस्थित सांगायचे की नाही. पण तीही नीट सांगितले नाही..

 काय तर म्हणे मी त्यांच्या बापाचा नावकरी म्हणून जन्माला आलो. म्हणून माझं नाव शाळेत त्यांच्या बापाच्याच नावानं ठोकून दिलं. पण पुढे पंचायत त्यांची नाही माझी झाली.

 पुढे कसं बस प्राथमिक सातवी पर्यंत शिक्षण झालं. आणि आठवीपासून माध्यमिक शिक्षण मित्राच्या घरी राहून पूर्ण केलं. यावरून परिस्थितीची कल्पना आली असेल..

पुढे कॉलेजला जाण्यासाठी घोडा अडलं.. तिथेही मित्राने खूप आर्थिक मदत केली. पण त्याचाच कॉलेजला नंबर न लागल्याने अवघ्या २००/- रुपयासाठी माझं शिक्षण थांबलं..

 नंतर ७२ च्या दुष्काळात रोजगार हमीचे काम सुरू झालं. शिकलेल्या पोरांनी माती उपसायची नाही म्हणून सुकडी वाटप करण्याचं काम मिळालं..

 तेही अर्धवट सोडून पुन्हा मित्रांनी नातेवाईकांच्या मदतीने उशिरा का होईना पण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एक शर्ट एक मांजरपाट पायजमा पायात चप्पल नसलेला, छोटीशी बॅग हातात घेऊन पुण्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

 दुसऱ्या वर्षी मित्राचाही नंबर लागला आणि माझे भाग्य उजळले. इथेही कशीबशी दोन वर्षे गेली.

रोज जेवणाचा डबा एसटीने गावाहून पुण्याला येई कधी कधी अंबलेला असला की, उपाशीच व्हायचा.. बऱ्याच मुलांना सवलती मिळायच्या पण मला सवलत मिळाली नाही. मी घरी बसलो होतो तरी माझी जात गरीब नव्हती. म्हणून मला सवलत नाही. गरीबीची काय व्याख्या होती ती त्या सरकारला आणि सरकारला सल्ले देणाऱ्यांना माहित...

 पण त्यातूनही मी तरलो. तरलो कसला मित्र आणि नातेवाईकांनी मला तर लिहा असे म्हणायला हरकत नाही. नाहीतर आजही मी काही गुरांच्या मागे रानावनात फिरलो असतो. किंवा कोणाच्या तरी घरी गाई गुरांच्या गोठ्यात शेणगारा बसलो असतो.

 आपण कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसले तरी त्या lमिळालेल्या जन्माचा सोनं कसं करायचं हे तर आपल्या हाती आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं. तेव्हा गरीब श्रीमंती यहा भेद नाहीसा झाला.

 आनंदाने राहायचं आनंदाने जीवन जगायचं आणि समोरच्यालाही चांगलं जीवन जगायला शिकायचं.. या उदात्त हेतूने लेखनाची सुरुवात झाली. पण कॉलेज झाल्यावर नोकरी करायला लागलो. आणि लेखनाची आवड असूनही त्याकडे दुर्लक्ष झालं.

 म्हणून म्हटलं संकटावर मात करत ही जगायचं आणि जीवनाशी दोन हात करायचे.गरिबी ही आपली मावशी किंवा मैत्रीण आहे असं समजून मस्त आनंदी जगायचं.. जीवन खूप सुंदर आहे. बाग किती सुंदर असली तरी फुलाला कुठे समजते. ती सुंदर आहे म्हणून... कुणाला तर आपला सुगंधही कळत नाही तो इतरांना समजतो. आपणही आपल्या बागेतला सुगंध इतरांना वाटत राहा. जीवनाची बाग अधिक सुंदर होईल. मृगजळाच्या पाठी लावू नका बेंबी स्वतः जवळ कस्तुरी असूनही ज्याला कळत नाही. असं जीवन जगू नका.. निसर्गाचा आस्वाद घ्या डोंगरदऱ्या नदी समुद्र झाड वेली पक्षी किती सुंदर आहे जग.. ते डोळे उघडे ठेवून बघा. जग खूप सुंदर आहे. गरिबी काय येते जात असते.. तिकडे फारसं लक्ष देऊन नका..

 अहो श्रीमंताला तरी कुठे गाठ झोप लागते. तोही तळमळत असतो. पण गरीब बिचारी माणसं आपापल्या झोपडीत राहणारी माणसं आणि त्यांची चिलीपीली बघा... निवांत शांत गाढ झोपलेले असतात. जीवनाची गंमत..



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy