स्वातंत्र्य (अभंग रचना)
स्वातंत्र्य (अभंग रचना)
विचार करणे । मानवी लक्षण ।
विचार औक्षण । स्वातंत्र्याचे ॥ १ ॥
प्रत्येकास वाटे । प्राणाहुण प्रिय ।
नसे हयगय । स्वातंत्र्याची ॥ २ ॥
नसे तडजोड । कशाची कशाला ।
हवी स्वातंत्र्याला । मोकळीक ॥ ३ ॥
स्वातंत्र्य अबाधी । सर्वांचे रहावे ।
मुक्त विहारावे । आसमंती ॥ ४ ॥
किशोर स्वातंत्र्य l मागतो सर्वांना ।
नको वेदनांना । थारा तेथे ॥ ५ ॥