पाण्याची मोटर आणि मी..!
पाण्याची मोटर आणि मी..!


उन्हाळा चालू झाला की
पाण्याचं गणित फिसकटतं
दैनंदिन जीवन जगण
सारच मग विसकटतं
ड्रम बॅरल घरो घरी
कोपऱ्यात येऊन बसत
त्यातून स्वार्थाचं
नवं दर्शन घडतं
मला पाणी, मला पाणी
पाण्यासाठी अघोषित आणीबाणी
त्यात स्वैर वर्तुणुकीची
खुपी छुपी मुक्तहस्ताची करणी
पाणी आलं, पाणी गेलं
पत्ताच काही लागत नाही
पाणी कुठं कस मुरत
तेच नेमकं काही कळत नाही
शेवटी धीर धरून धरून
लक्ष ठेऊन
मोटर ची निगराणी केली
तरी सुद्धा ऐनवेळी मोटर पाण्याची
माझी खोडी काढून रुसली
मग शे पाचशेहे बडवले
कँडेन्सर बिनडेन्सरच्या डोंबलावर
काय करणार ऐनवेळी
पाण्याचा प्रश्न बसता ऐरणीवर
शेवटी सत्यनारायण पाण्याचे
यथासांग पैसे मोजून पार पडले
तेंव्हा कोठे टाकीत पाण्याची
इंच दिड इंचाच्या धारेचे दर्शन घडले
जीव भांड्यात पडला
टाकी पाण्याने भरल्यावर
आणि आनंद झाला मला
सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहिल्यावर....!