STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

3  

Prashant Shinde

Drama

एक सुंदर सूचना....!

एक सुंदर सूचना....!

1 min
540


एक सूंदर सूचना

दाराजवळच्या भिंतीवर वाचली

खरेच मला ती

खूप मनास भावली


मायेची ती जणू

गोड सावली

जी भिंतीवरी

अक्षर रूपे उमटली


प्रेम स्नेहाचा धागा

पिढी बरोबर सरकतो

अंतरात तो सदा

मायेने वास करतो


काळजी तान्ह्या बाळाची

जाणवते शब्द शब्दात

तीच उमटते कागदावरी

गोड सूचनेच्या अशा रुपात


लिहीणाऱ्याची माया जाणवे

निळ्या अक्षरी रेखल्या शाईत

असेल नक्की पिल्लू तयाचे

गळ्यातील अवीट प्रेमळ ताईत....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama