STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Drama

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Drama

श्रद्धांजली

श्रद्धांजली

1 min
16.5K


होता रस्त्याच्या कडेला पडलेला तो बेडूक निवांत

नव्हती त्याला कसली चिंता,नव्हती कसली भ्रांत


सारी गात्रे झाली होती त्याची शांत - शांत

ओरडत नव्हता डरांव-डरांव, करीत नव्हता आकांत


सुटला होता या जगाच्या मोहमयी पाशातून

मिळाली होती त्याला मुक्ती जगण्याच्या शापातून


वाचले जीवशास्त्रज्ञ, आणखी एका जीवहत्येच्या पापातून

कारण झाली सुटका त्याची ह्या दुनियेच्या तापातून


हिवाळ्यात खडकात आणि उन्हाळ्यात चिखलात लपला

आयुष्यभर लपला तरी शेवटी रस्त्यावर येऊन खपला


गरीब बिचारा तळ्यात जगला,खल्लास झाला रस्त्यावर येऊन

कुणास ठावे काय मिळविले,त्याने या जगी जन्म घेऊन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama