STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Tragedy

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Tragedy

समृद्धी ?

समृद्धी ?

1 min
6.4K


विकासाच्या ठेकेदारांनो, कुठे गहाण ठेवली बुद्धी?

बळीराजाचा बळी घेऊन, कशी येईल “समृद्धी?”


शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमिनींचे मोजमाप

पाशवी बलाने चिरडताय तुम्ही त्यांचा संताप

उघडा डोळे, येऊ दया तुमच्या विचारांमध्ये शुद्धी

बळीराजाचा बळी घेऊन, कशी येईल “समृद्धी?”


खोटेनाटे उद्योग करुनी करता जमिनी काबिज

कृत्यात तुमच्या दडले आहे विनाशाचे बीज

लूट माजवून करता धनदांडग्यांशी संबंधवृद्धी

बळीराजाचा बळी घेऊन, कशी येईल “समृद्धी?”


फौजफाटा घेऊन सोबत करताय त्यांचा बंदोबस्त

नष्ट करुन शेती करताय पिढ्या त्यांच्या उध्वस्त

वेळीच थांबा नाही तर शेवटी होईल तुमचीही बरबादी

बळीराजाचा बळी घेऊन कशी येईल "समृद्धी?"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy