माय रडते गोठ्यात
माय रडते गोठ्यात


माय रडते गोठ्यात
उरी फुटला जरी पान्हा
परी माणसाच्या दावणीला
ती आणि तिचा तान्हा
आपल्या त्या स्वार्थासाठी
वासराचे तोडी दूध
पैशासाठी विकी त्यांना
नाही कोणती सुध बुध
माणसा तुझ्यासारखीच
असते रे त्यांना माया
परी तुझ्या हाती लाठी
दावणीला बांधशी काया
दूध पित्या वासराची
करीशी रे ताटातूट
ओढ घेई दावणीला
जिव लेकरात गुत
माणसा माणसा कुठे
फेडशील हे पाप
परमेश्वराच्या लाठीचा
तुला बसतो मग चोप
करोना सारखा विषाणू
तुझ्या भेटीला येतो
माय लेकराचा ताटातुटीचा
मग तुला अर्थ कळतो