आता तरी तयार रहा
आता तरी तयार रहा
आता तरी तैय्यार रहा
अजून तिच्या मेहंदीचा
रंग होता ओला ओला
तोच तिच्या सौभाग्यावर
आला दैत्याचा घाला
अजून तिच्या भांगातला
सिंदूर नव्हता वाळला
तोच अतिरेक्याने मारले
तिच्या प्राणप्रिय पतीला
पहिलेच पाऊल तिचे
रमले होते नंदन वनात
आनंदाच्या हिंदोळ्यावर
झुलत होती ती मनात
सुखाचा सुंदर प्याला
ओठाशी नुकताच आला
तोच त्या सैतानाने
मातीत त्याला पाडला
सहा दिवसाचा संसार अवघा
काय सोसले काय भोगले
माहित फक्त तिच्या जीवाला
संसाराला ग्रहण लागले
पतीच्या शवापाशी
राहिली ती बसून
सगळ्या भावभावना
गेल्या होत्या थिजून
पाहून त्या दृश्याला
रक्त खवळले आहे
कोण्या एका बहिणीसाठी
मन हळहळले आहे
नकोत आता कॅन्डल मार्च
नकोत आता नुसत्या वल्गना
पकडून त्या नराधमांना
फासावरती चढवा ना
काळाची ओळखून पावले
आता तरी सावध व्हा
किमान कुटुंब रक्षिण्यासाठी
आता तरी तैय्यार राहा
