तेलही गेले तूपही गेले
तेलही गेले तूपही गेले


धनुष्य निसटले हातातून
हृदयात घुसला बाण
पक्ष चोरला म्हणत म्हणत
कंठाशी आले प्राण
आता वण वण फिरू लागले
करू लागले शब्दाचा खेळ
आधीच डोळे उघडले असते
तर आली असती का ही वेळ?
अहो नको होते यांना
शेंडी जानव्याचे हिंदुत्व
आता मात्र घेतले आहे
जाळीदार टोपीचे पितृत्व
वडिलोपार्जित गादी होती
काय यांचे होते कर्तुत्व
लायकी यांची नसताना
हाती मिळाले होते नेतृत्व
अडीच वर्षाचे मुख्यमंत्री
अडीच दिवस काम करतात
उरलेले बाकीचे दिवस
टोमणे मारण्याचे काम करतात
50 खोके एकदम ओके
बाकी सारे ओके बोके
ते गद्दार हे खुद्दार
म्हणत म्हणत दिवस गेले
तेलही गेले तूपही गेले
आता हाती धुपाटणे आले