समस्त काकांची कैफियत
समस्त काकांची कैफियत


या पुतणे नावाच्या जमातीने
फारच दिला आहे त्रास
कितीही भरवा त्यांना
सोन्याच्या ताटात घास
बसायला आसन नेसायला वसन
दिलं सारं काही
पण यांच्या आपल्या शर्टाची
सतत दुमडलेली बाही
दिले यांना मंत्री पद
दिली लाल दिव्याची गाडी
आमच्या जीवावर यांनी
घेतली बंगला माडी
पद दिले सन्मान दिला
शेजारी मांडलं पान
पण एवढंसं बोललं की
लगेच होतो यांचा अपमान
काही झालं तरी शेवटी
पोटाकडेच वळणार ना पाय
मायबाप जनतेने सांगावे
आमचे तरी चुकले काय