इंग्रजी विंग्रजी
इंग्रजी विंग्रजी
--------------------------
आमच्या स्वयंपाकाच्या मावशी शिकल्या नाहीत जास्त,पण आहेत एकदम भारी ...
अवाक होतात सगळे पाहून,इंग्रजी बोलण्याची त्यांची अदाकारी !
इतरांचे बोलणे ऐकून बेमालूम इंग्रजी शब्द वापरतात..
जसं काही सर्वचं कळतं असा मोठा आव आणतात!
शेजारचे नव्वदीचे आजोबा चढतात चार मजले भरभर...
लिफ्टही वापरत नाहीत पण दमत नाहीत घडीभर !
वयासारखे दिसत नाहीत मोठे ,डॉक्टरही होतात चकित...
'बर्थ' ऐवजी 'डेथ 'सर्टिफिकेट बाळगा, मावशींच्या सल्ल्याने आजोबा होती अचंबित!
घरातील सीसी टीव्ही बंद पडला होऊन 'लूज कनेक्शन'...
मावशी म्हणतात बहुदा त्याला झालंय 'लूज मोशन' !
मी केलेल्या उपम्याला म्हणायचं असतं त्यांना चविष्ट...
इंग्रजी बोलण्याच्या नादात 'हॉरिबल' म्हणून करतात मला रुष्ट !
'बर्थ'ला म्हणतात 'डेथ', 'कनेक्शन'ला 'मोशन', 'चविष्ट' ला 'हॉरिबल'...
कुठलेही शब्द कुठेही बेमालूम बसवतात चपखल !
मावशींचा इंग्रजी चा उत्साह दिवसेंदिवस वाढतच जातोय...
जीवनाचा हा टप्पा मजेशीर प्रसंगाने हुरूपच आणतोय !
घेतलीये कागद पेन्सिल, रोज शिकवतेय मावशींना इंग्रजीचा धडा....
एकीला तरी साक्षर करायचे हा उचललाय मी विडा !
