STORYMIRROR

Jayashree Kelkar

Others

3  

Jayashree Kelkar

Others

बाप नावाचा आईमाणूस

बाप नावाचा आईमाणूस

1 min
257

बाबा, तुम्ही जरी असलात वडील,आहात 'आमची आई '..

लहान असताना आम्हा दोघांना वाटायची ती अपूर्वाई !


बाबा, तुम्ही 'करुणा' अन 'मूर्तिमंत प्रेमळ 'रूप 

आईची उणीव भासवली नाहीत करुनि 'निस्वार्थी प्रेम ' खूप !


बाबा, तुम्ही म्हणजे 'ममतेचा सागर 'अन 'काळजीचा डोंगर '...

करुनि 'निरोगी संगोपन 'झालात आमच्या 'जीवनाचे कारीगर ' !


बाबा, ठेवून आमच्यावर 'विश्वास ', बनलात 'सर्वोत्तम पालक '...

'त्याग ' करूनि वेळोवेळी,दिसली आम्हाला आईची 'झलक '!


म्हणून जगातील 'उत्कृष्ट आईचा ' किताब बाबा तुम्हालाच आहे...

"बाप नावाचा आईमाणूस" म्हणून तुमचाच 'गौरव'अटळ आहे !


Rate this content
Log in