STORYMIRROR

Jayashree Kelkar

Tragedy

3  

Jayashree Kelkar

Tragedy

अधुरे प्रेम

अधुरे प्रेम

1 min
424

--------------------------

ढग दाटूनी धुंद बरसलास,

केलीस ना आठवणींची बरसात ...

दाटलेल्या स्मृती ओघळल्या क्षणात...

स्मृतींच्या वादळात कुठे हरवलास !


बघुनी प्रणयी जीवांचे मोहक हावभाव,

आठवणी छळती मला मनःचक्षुपुढे...

नको छळू स्वप्नात येऊनी यापुढे...

समोर उभा ठाक सोडूनी अहंभाव !


वादळी रात्र होती ती मेघगर्जनेची..

चिंब आसुसून बुडाल्या मनलहरी,

कल्पनेतही ना उमजली यातना कल्लोळाची...

रेखाटलेल्या भावनांच्या सरीवर सरी !


अवचित तुजला पाहूनी दुसरीच्या मिठीत,मनावर उमटला वियोगाचा ओरखडा...

साद देऊनी तिच्या प्रेमाला, नको जाऊ देऊ विश्वासाला तडा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy