STORYMIRROR

Jayashree Kelkar

Romance

3  

Jayashree Kelkar

Romance

गंध तुझा आगळा

गंध तुझा आगळा

1 min
215

माझ्या मनाला जपण्यासाठी तुझं अस्तित्व सतत झटत होतं...

तुझ्या सानिध्यात

गंधांच दरवळण भावत होतं !


तुझ्या प्रत्येक हालचाल,लगबगीने तनामनात शिरायचा सुगंध...

तुझा राग,लोभ, अनुनय करायचा मला बेधुंद !


कधी स्वप्नात ,कधी सत्यात,कधी मिठीत तर कधी दुराव्यात...

रातराणी सम तुझा गंध, लहरी उमटवायचा रोमारोमात!


तुझ्या गंधमय आठवणींनी उमटले स्पर्शाचे शहारे...

क्षणिक भानावर आलो,

उन्मळले स्वप्नांचे मनोरे!


पाहिली वाट तुझ्या गंधमय सहवासाची,

झालो मी आक्रस्ताळा...

उठला मनी कल्लोळ,

आठवीत राहिलो गंध तुझा आगळा !


नको निष्ठुर होऊ अशी,

तू माझं अंतरंग अन मी तुझा श्रीरंग...

ये ना परतुनी साजणी

उमटवित गंधित तरल तरंग !

उमटवित गंधित तरल तरंग !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance