STORYMIRROR

Jayashree Kelkar

Inspirational

3  

Jayashree Kelkar

Inspirational

रंगुनी रंगात

रंगुनी रंगात

1 min
416

आयुष्याच्या रंगपटावर उधळले मी रंग...

कधी आनंद तर कधी ऊर्जेत होते मी दंग ! 


छोटीशी बालमूठ 

छोटंसं बालविश्व...

सप्तरंगात न्हालं माझं 

नाजूकसं भावविश्व !


तारुण्यातलं पदार्पण म्हणजे रंगांची उधळण...

जोडीदारासमवेत गवसली प्रेमाची पखरण !


संसारात डुंबले प्रेमरुपी केशराच्या धुंद सुवासाने ...

वेदनेचे काळे ढग ही उजळले रुपेरी किनारीने !


लाल गेरू ने सारवला आयुष्याचा सारीपाट...

मनावरची काजळी झटकून सोपी केली बिकटवाट !


लाल लाल गेरूवर घातले रांगोळीचे ठिपके...

नाही जमले आधी पण नंतर झाले पक्के !


प्रयत्न होता विविध रंग सुबकतेने भरण्याचा...

मिसळले एकमेकात तरी सोडला नाही ध्यास चिकाटीचा !


इंद्रधनुषी रंग भरले वेगवेगळ्या जीवनटप्पी...

सप्तरंगात न्हाऊन केली आयुष्याची कोडी सोप्पी !


भरले विविध रंग लाल,पिवळा,हिरवा,

नारंगी अन निळा...

पांढरा मिसळून त्यात उठाव आणला आगळावेगळा !!


लाल रंग उल्हासाचा अन जोशाचा..

पिवळा रंग पवित्रतेचा अन समृद्धीचा !


हिरवा रंग सृजनाचा अन सकारात्मकतेचा..

निळा रंग शांती आणि स्थिरतेचा !


पांढरा रंग मिळूनमिसळून राहण्याचा..

नारंगी रंग हा आनंद अन ऊर्जेचा !


काव्यरूपी रंग भरून केला ध्यास नाविन्यतेचा..

वाचन अन लिखाणाने रंगवला दृष्टिकोण सकारात्मकतेचा !


संस्काररूपी रांगोळीने जीवन रंगीबेरंगी जाहले..

उत्तम,उदात्त,जिगरु वृत्तीने आयुष्य खंबीर झाले !


फुलांच्या पाकळ्यांच्या विविधतेने उजळली रांगोळी...

नैराश्य, उद्विग्नतेची केली कायमची होळी ..

केली कायमची होळी !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational