Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Jayashree Kelkar

Romance

4.6  

Jayashree Kelkar

Romance

वृद्धावस्थेतील प्रेमसंबंध

वृद्धावस्थेतील प्रेमसंबंध

1 min
380


आज मी पासष्टीची अन् आमचे हे सत्तरीचे...

फुलवतो भावविश्व अनुभवून दिवस गोडीगुलाबीचे !


सकाळचा चहा यांच्या हातचा,डोळे मिचकावत देतात..

साखर घालायला विसरलो म्हणत माझ्या शुगरची काळजी घेतात !


मिळतोय आयता,मीही पिते आवडीने...

खुश करते त्यांना, करूनि चविष्ट जेवण त्यांच्या मर्जीने !


दुपारच्या वेळी मांडतो सोबत्यांबरोबर पत्त्यांचा डाव...

लहानांसारखे भांडतो, नसतेच जिंकायची हाव !


जातो फिरायला हात धरून एकमेकांचा, लाजत नाही क्षणभर .....

लाडिक हट्टाने पुन्हा अनुभवतो तरुणपण मणभर !


दमल्यावर कुरकुरत नाही,बसतो बाकावर फतकल मांडून....

गजरेवाल्याकडून गजरा घेत पूर्वीची स्मृती येते उफाळून !


भेळवाला दिसताच तोंडाला सुटते पाणी...

यांच्या वटारलेल्या डोळ्यांकडे पाहून बिचारा निघून जातो केविलवाणी !


यांना नाही कसलीच आवड,पण मी ऐकते की काय ...

गुपचूप आईस्क्रीम खाल्ले तरी खोकल्याला फुटतात हजार पाय !


माझी नसते खैर,आरडाओरडीने हैराण होतात कान...

इतका जीव काळजी करतो बघून सुखावतो माझाही प्राण !


शारीरिक व्याधी, वादविवाद यांचे करत नाही उच्चारण...

जीवनाच्या सांजवेळी मिळवतो आनंदी मधुर क्षण !


Rate this content
Log in