सांग ना रे पावसा...तू माझ्या
सांग ना रे पावसा...तू माझ्या
सांग ना रे पावसा...तू माझ्या राजसाला
वाट तुझी बघून थकलीय म्हणावं त्याला ...
रात्रंदिनी आस तुझी, आईबाबांची लगीनघाई
कशी जगेल ती तुजविण, चित्त तिचं थाऱ्यावर नाही
सांग ना रे पावसा...तू माझ्या राजसाला
त्याला म्हणावं ...अंत आता पाहू नको ...
वादळासारखा बेभान होऊन सरळ येऊन मलाच भेट
भेटीस आतुर मी सरिता .... सागरासारखं निर्भीड होत
सांग ना रे पावसा...तू माझ्या राजसाला
त्याला म्हणावं ...क्षितिजासारखं आभासी तू होऊ नकोस
काहीही झालं तरी मजला सोडून तू जाऊ नकोस
तुजविण ती जशी पाण्यावाचून मासळी जणू ...
सांग ना रे पावसा...तू माझ्या राजसाला
त्याला म्हणावं ओढ जशी मला वसुंधरेची...
तीच ओढ तुझ्या सखीची, अंतर तिला देऊ नको
तीच तुझी जीवनसंगिनी ...तूच तिचा प्राणसखा