Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

तू गेलीसच शेवटी अधांतरी सोडून

तू गेलीसच शेवटी अधांतरी सोडून

3 mins
300


तू गेलीसच शेवटी अधांतरी सोडून .....

मी कोण अडवणार तुला ? सांग ना

कसा अन कुठपर्यंत ? थकलो शेवटी

तू केलीस मनमानी सदा नी कदा दरवेळी


तू माझ्यासाठी कायमच अनाकलनीय कोडं होतीस

पण माझ्या बाळाचं मायेचं पांघरून छत्रछाया निसंदेह

सात फेऱ्यांचे वचन मी ही नाही निभावू शकलो ग खरंच

तुझ्या गुणदोषांसहित स्वीकारलं होत तू मला पण मी काय केलं ?


मी तरी काय करू ग मी असं फाटका गरिबी पाचवीला पुजलेली

कुठून देणार होतो बंगला गाडी नोकर चाकर सर्वकाही ?

तू स्वभावानं गोड होतीस पण आजारपणानं हट्टी चिडचिडी झालीस

माझं ही चुकलंच मी तुझं औषधपाणी खर्च भागवू शकलो नाही कधीच


किती किती स्वप्न रंगवली असशील तू उमरा माझा ओलांडताना

किती खुश होतीस तू स्वीकारलं होतं आम्हाला गरिबीसकट

तिथेच तू चुकलीस ग अन भुरकट गेलीस आमच्या दरिद्री आयुष्यात

राख रांगोळी तुझ्या सुखी संसाराच्या स्वप्नांची अपेक्षांची तेंव्हाच .....


तुझी मनाची घालमेल सासरी येण्याची धडपड आर्त हाक प्रेम

मला कळत होत सारं पण तुझी काळजी घेणारी कुठून आणणार होतो

तुझं फोनवर बोलणं ऐकून बरही वाटत होत काळीज चिरून जात होत

तुझे प्रत्येक शब्द पटत होते कधी भावविभोर होऊन एकांतात रडतो होतो ग


तू लग्न होऊन घरी आलीस सगळ्यात मिसळून गेली होतीस

शक्य तितके समजून घेतले ही पण दोघांनी दशकभर पण

संसार वेलीवर बहरणार चिमुकलही बघता - बघता मोठं झालं

प्रेमळ समंजस माहेरची माणसं असताना देखील तू निर्दयीपणे सोडून गेलीस


एकवेळ माझ्यावर रुसणं स्वाभावीक होत मी कमी पडलो तुला दिलेली वचन निभावण्यात

पण चिमुरड्यावर का हा अन्याय ? असं अचानक जीवनयात्रा संपवताना त्याचा निरागस चेहरा

तुला का नाही आठवला ? का फिरली नाहीस माघारी प्रेमळ भाऊ अण्णा अक्का वाहिनीसाठी

मी एवढं वर्ष राहीन माहेरी मग दोघेही येऊ म्हणाली होतीस ना मला माझीही मूकसंमती होतीच ना


नव्हतो बोलू शकत मी सर्वकांही पण माझ्या बाळासाठी तरी नव्हतं जायचंच असं अवेळी

मान्य आहे मी कमी पडलो तुझ्या आशा आकांक्षा अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो तरीही

मलाही तू हवी होतीस कुठेही असो पण सुखी असावीस तुझा आवाज कानी यावा रागवाव रूसावं

बाळाची काळजी कौतुक करावं सासरची माणस ही आपलीशी केली होतीस तू पण सर्वकाही निरर्थकच


तुझे प्रत्येक शब्द हृदयाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवलीत मी , त नेहमी म्हणायचीस

माझ्या भैय्याला जीव लावा मी शेवटपर्यंत तुमची साथ नाही देऊ शकणार तेंव्हा ...

मला काय वेदना होत होत्या ते तुला कसं कळणार ? अखेर तू तझा शब्द खरा केलास

मला वचनात अडकवून तू गेलीस कायमची पण आपल्या बाळाच्या जबाबदारीच ओझं ठेवून


तू केलीस सुटका स्वतःची असह्य आजारपणातून फाटक्या संसारातून जाबदारीतून

पोरकं केलस मला आपल्या बाळाला अन सर्वार्थानं सासर माहेरच्या हताश जीवांना

माझं समग्र जीवनचं हिरावूंन घेतलस तू माझं प्रेम , चारित्र्य प्रामाणिकपणा अन आत्मीविश्वासही

तू असताना मन मारून जगत होतो चिमुकल्यासाठी निर्लज्जासारखं धडपडत होतो कसा तरी

आता काय उरलं जीवनात कुठल्या आशेवर जगावं ? फेकून द्यावीत वाटते ही देहाची लक्तर यावं तुझ्या पाठीशी


प्रारब्ध म्हणावं की नशिब की कर्तव्यशून्यता पण मी काहीही करू शकलो नाही जीवनात

ना चांगला मुलगा होऊ शकलो ना पती , ना चंगळ बाप होऊ शकलो ना आदर्श नागरिक

भ्रमिष्टासारखं दिशाहीन चालत राहिलो ,उपकाराच्या ओझ्याखाली निर्जलज्जासारखं असच

अन आता हाती काही उरलं नाही पदरी निराशा , अवहेलना , द्वेष ,तिरस्कारच सोसावं लागेल बहुदा


खरंच मी इतका वाईट आहे का ग ? तूच सांग ना माझं प्रेम त्याग समर्पण कर्तव्य तत्परता

असहाय्य्यता घुसमट कुणीच का बर समजून घेत नसेल ? मी गुन्हेगार आहे सर्वांचाच

त्यांचा तुझा आपल्या बाळाचा ? म्हणून कि काय इतकी शिक्षा नियतीनं समाजांन दिली असेल

नाही सहन होत ग आता थकलोय मी रडावं वाटतं तुझ्या कुशीत शिरून विलिन व्हाव तुझ्या बाहुपाशात कायमचंच


नाही उमटणार कधी तुझ्या पावलांचे ठसे माझ्या अंगणी

गेलीस सोडून निष्टुर निर्दयीपणे हृदयावर घाव घालुनी

कुठल्या तोंडानं म्हणू तूच सांग ना चिमुकल्या येईल परतुनी

बाळा आई तुझी घेईल कुशीत तुजला पुन्हा अशा सांजवेळी


Rate this content
Log in