Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Vijay Sanap

Tragedy


3.2  

Vijay Sanap

Tragedy


मोबाईल

मोबाईल

1 min 27.2K 1 min 27.2K

      ।। मोबाईल ।।

_____________________

हल्लीच्या या यूगात आज

फार मोठा बदल झालाय

अन् या मोबाईलमुळं महा

व्हॉयरस आजार आलाय ।।

जेव्हा तेव्हा हतामधी

खूळखूळयागत दिसतय

कुठलाही पहवा माणूस

तो माकडावाणी दिसतय ।।

कधी माणसात आलं की

निसतं टूकूं टूकूं बगतय

बोटावर बोट आपटित

मनातल्या मनात हसतय ।।

व्हॉटस्अॅप आणि फेसबुक

त्यातच मुंडकं असतय

कुणी काही ही बोला ते

मुक्या मैंदावाणी बसतय ।।

मोबाईल नाही म्हणालं

तर बारकंबी वरडतय

कितीही लागली भूक

तरी पियाच सोडतय ।।

माणूस माणसात बसना

त्यालाबी डिस्टॉप होतोय

एकदा का घंटी वाजली की

स्वतः बोलत निघून जातोय ।।

या मोबाईलमुळं जेवण

नाही हो वेळेवर मिळत

घरात कोण काय बोलतं

ते काहीच नाही कळत ।।

स्मशानभूमीत गेला तरी

व्हॉटस्अॅप असतं छळत

हा असतो त्याच्या धुंदीत

ते जळणारं असतं जळत ।।


Rate this content
Log in

More marathi poem from Vijay Sanap

Similar marathi poem from Tragedy