एक हताश शेतकरी
एक हताश शेतकरी
1 min
41.9K
एवढं काबाडकष्ट करून
तीन वेळचं सोडा हो
दिवस काढले मी
एकचं वेळ जेवण करून
मंत्रालयात आलो होतो
माझी समस्या घेऊन
थकलो मी तुमची
वाट पाहून पाहून
मी नव्हतो मागत काही
तुमच्या कडे मोफतचे
अहो मला तर सांगायचं होत
तुम्हाला हमीभावाचे
तुंम्ही सर्व घरी निघून गेले
माझ्याकडे लक्ष
तुम्हा कुणाचंच नाही गेले
शेवटी मी विष प्राशन केले
एवढ्यात विसरले ना मला
अहो मी धर्मा पाटील
शेतकरी हताश झालेला
