प्रेमरंग
प्रेमरंग
1 min
312
छन छन करी तुझी
पायातली ती पायल
मधुर आवाज कानी
पडता झालो घायळ
तुझ्या नजरेचा तिर
हृदयी भेदून गेला
इथेच माझ्या प्रेमाचा
तिने असा अंत केला
उधळशील कितवर
प्रेमरंग तू प्रेमाचे
लागेल डाग तुलाही
तुला गं प्रेम कुणाचे
नको खेळ असा खेळू
तू कुणाच्या भावनेशी
कुणावर केलं प्रेम
बोल तुझ्याच मनाशी
