STORYMIRROR

Ramkrushn Patil

Romance

4  

Ramkrushn Patil

Romance

प्रेमाच्या पाऊसधारा

प्रेमाच्या पाऊसधारा

1 min
184

मेघा रे मेघा रे

पाऊसधारा बरसू दे

तिच्या आणि माझ्यामध्ये

प्रेमाचा अंकुर फुटू दे


बरसत आहेत पाऊसधारा

तिला मन माझं शोधतंय

तिच्या प्रेम पावसासाठी

मी वेडा चातक वाट पाहतोय


श्रावणसरी बरसताना

तू माझ्या जवळ असावीस

होता विजेचा कडकडाट

हळूच माझ्या कुशीत शिरावीस


तुझ्या प्रेमाच्या पाऊसधारा

अशा माझ्यावर बरसू दे

होऊ दे तृप्त एकदाचा मला

मनसोक्त तुझ्या प्रेमात भिजू दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance