STORYMIRROR

Shashikant Shandile

Romance

4  

Shashikant Shandile

Romance

प्रेम तुझे नि माझे .........

प्रेम तुझे नि माझे .........

1 min
28.6K


पाहुनीया प्रेम मनाचे

हृदयात दिली जागा

अदृश्य फसव्यागिरीने

बांधिला प्रेम धागा

सजला त्या कंटकाने

जीवनाचा बगीचा

अंध डोळ्यांनी बसलो

हातरुनी गालीचा

वाटले होते मजला

जाहले स्वप्न पुरे

बघताना मात्र मागे

आज सारे अपुरे

फसव्या या आसवांना

ओळखू मी न शकलो

उध्वस्त झाले हे जीवन

एकांती आज निजलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance