तू दिलेले घाव
तू दिलेले घाव


तू दिलेले घाव मी सोसले......
तू बोलले शब्दही मी झेलले....
तू दिलेल्या विरह यातनात आजही मी जळतेय.....
पौर्णिमेच्या मोहक रात्रीत तुझ्या आठवणीत तडपतेय....
डोळ्यात फक्त तुझे स्वप्न जपतेय....
मनातल्या मनात तुझीच पुजा करतेय.....
जगतेय मी खरी पण तुझ्याविन तितकीच तीळतीळ मरतेय....
क्षणाक्षणाला सख्या तुझ्या फोटोकडे पाहून मनप्रीत जपतेय.
तुझ्याविन मी अपूर्ण आहे हे कवितेतून मांडतेय.....
तुझ्या वाटेकडे नयन लावून रांत्रदिवस तुझी वाट पाहतेय....