STORYMIRROR

Radhika Chougule

Romance

4  

Radhika Chougule

Romance

पाऊस निरोपाचा..

पाऊस निरोपाचा..

1 min
28.1K


जितकं भावलं तुझं येणं,

तितकंच सलतंय तुझं जाणं..


अलगद उलगडल्यास मनातल्या गाठी,

आठवणींच गाठोडं ठेवून गेलास पाठी


सग्गळ्या चिंता एका सरीत विझवल्यास,

आणि खूप खूप आनंदी कळ्याही खुलवल्यास.


कळ्या फुलल्या ,

मन झालं अत्तरदाणी.

तुझ्या खुणेचं डोळ्यात ठेवलंस दोन थेंब पाणी .


कधीतरी अवचित् अंगणात उतरतोस.

मुठभर थेंबांनी माझे डोळे भिजवतोस.


थेंबांचा हिशोब ठेवायचा कोणी !

माझ्यातल्या तू की तुझ्यातल्या मी.


आता हळूहळू तुझं अवचित् येणं बंद होईल.

आणि मला काळ्या ढगा आतलं तुझं रुप आठवत राहील .


हळूहळू सरेल मनाच्या तळ्यातलं पाऊसपाणी..

पण बदलतील रुतु, मन पुन्हा गाईल गाणी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance