STORYMIRROR

Radhika Chougule

Fantasy

3  

Radhika Chougule

Fantasy

अळवावरचं पाणी

अळवावरचं पाणी

1 min
14.2K


पाहिलं आहेस कधी,अळवावरचं पाणी ..


पाहणाऱ्याला वाटतं की,

एक विशाल पान एका कोवळ्या थेंबाला आपल्या कवेत घेऊन राहिलं आहे .


पण वस्तुतः त्या विशाल पानाच्या प्रेमात पडून त्याच्याकडे झेपावलेला तो थेंब अद्यापही आपलं अस्तित्व जपण्याचा आणि त्यातही पानाच्या देठाच्या हृदयाशी पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो .


या प्रयत्नात तो त्याच्याही नकळत आपलं अस्तित्व त्या पानाच्या अंतरंगात विरघळून टाकत असतो .इतकं की एका अंतरावरुन तो थेंब दिसूनही येत नाही .

त्या थेंबाच्या अंतरंगात दिसतं ते फक्त पान ..


पण पानाला कुठे या धडपडीची कल्पना. ते तर वाऱ्याच्या दिशेनं झोके घेत आकाशाला गवसणी घालण्याच्या महत्वाकांक्षेत मग्न असतं. त्याला या यतकश्चित् थेंबाची कुठून पर्वा..

हळूहळू त्या थेंबाची गात्रं थकतात आणि पानाच्या हृदयाकडे पोहोचण्याचा आपला अट्टाहास सोडून तो निश्चल रहातो आणि एका क्षणी मातीकडे झेपावतो..

पानाच्याही नकळत ..


असं नातं कधीच कुणाचं कुणाशी असू नये..

पण नातं तुझं माझं ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy