STORYMIRROR

Ashita Chitnis

Fantasy

4  

Ashita Chitnis

Fantasy

आनंदवारी

आनंदवारी

1 min
765

जुने फोटो चाळता चाळता

नकळत डोळे ओले झाले

दुरावलेले वैभव जेव्हा 

कागदाच्या तुकड्यावर दिसले


जीर्ण कागदी चिंध्यांमधून

आठवणी डोकावूं लागल्या

अवखळ पोराच्या पायाने

चौफेर धावू लागल्या


त्यांचा माग काढत काढत

मीही भूतकाळात पोहोचले

ओळखीच्या चेहऱ्यांना बघून

लहान बाळागत हसले


सुरकुतल्या हातांनी मला 

मायेने कुशीत ओढले

सवंगड्यांच्या कळपात मग 

सहजपणे शिरले


फुलझाडांच्या ताटव्यांनी

मागचे अंगण होते फुलले

इथेच तर कधीतरी मी

यथेच्छ होते हुंदडले


जांभळाच्या झाडाखाली होता

अजून टपोरा सडा

कौलावरच्या मनीनेसुद्धा

चुकवला पुन्हा खडा


खोलवर रुतलेली दगडी विहीर

आ वासून पाहत होती

धावत जाईन म्हणून परत

बागुलबुवाची घातली गेली भीती


आनंदमेळा हा सगळा आठवत

मन फिरून आले अलगद

फोटो मधले डोळेही तेव्हा

ओले झाले असतील नकळत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy